ऐसें कैसें केलें देवा । घडली नाहीं कांहीं सेवा ॥१॥
नाहीं देहाची ह्या चाड । जावो अथवा राहो द्वाड ॥२॥
परी पडो न विसर । हेंचि मागों दिगंबर ॥३॥
चरण विसंबो ना क्षण । ’रंग’ राहो निर्मळ मन ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.