तुझ्या द्वारींचा भिकारी । नको धाडूं द्वारोद्वारीं ॥१॥
ब्रीद जाईल जाईल । कीर्ति लोपेल सकळ ॥२॥
दासा घेईं बा पदरीं । माझी स्वीकारीं नादारी ॥३॥
आप्त बंधु तूंचि एक । माय बाप गुरु सख ॥४॥
नेणें तुज विण अन्य । आलों शरन शरण्य ॥५॥
चरणी लोळूं दे निःसंग । जेणें धन्य जगीं ’रङग’॥६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.