येईं बा सद्गुरुराया । निरसीं भवबंधन माया ॥ध्रु०॥
पहासी असा किती अंत अनंता । काय मागसी मज भगवंता ॥
पापी असें तरीं तूं अघत्राता । धांवत ये सदया ॥येईं बा०॥१॥
तुज विण कोणा बाहूं समर्था । तारक त्रिभुवनीं आन न नाथा ॥
गाऊनी गाथा नमवूं माथा । अभय करीं सखया ॥येईं बा०॥२॥
गुंतलासी कोठें गुरुनाथा । उपेक्षिसी कां दीन अनाथा ॥
मरतो तव विरहें अजी ताता । तारीं ’रङग’ कृपया ॥येईं बा०॥३॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.