जातक कथासंग्रह

ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपू्र्वी भागवत धर्माचा पाया रचला, त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा पाया आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी रचला आहे. बौद्ध धर्म दोन हजार वर्षांपेक्षा अधिक कालपर्यंत निम्म्या मानवी जगात प्रचलित असूनही त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे.

धर्मानंद कोसंबीआचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी बर्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel