बऱ्याच वेळेपासून तो एकटाच मार्ग शोधत-शोधत चालला होता. त्याच्याबरोबर दुसरे कोणीही नव्हते. त्यामुळे तो शांतपणे एकटाच आपला मार्ग शोधत होता. तितक्यात अचानक ती त्याच्या समोर आली. त्या दिवशी देखील ती अशीच अचानक त्याच्या समोर आली होती. हे त्याला आठवले. पण त्या रिक्षाचालकाला पैसे देण्याच्या गडबडीत तिच्याकडे त्याचे दुर्लक्ष झाले आणि ती तशीच अचानक तिथुन नाहीशी झाली. त्या दिवसानंतर पुन्हा आज त्याची आणि तिची भेट झाली होती. पण ही नेमकी आहे तरी कोण? आणि ही अशी अचानकच, आपल्यासमोर कशी काय सारखी-सारखी येते? असे कितीतरी प्रश्न त्याच्या मनात रेंगाळत होते. पण तिची आणि त्याची ओळख नसताना ‘या विषयावर तिच्याशी कसे काय बोलायचे? हा विचार करत असताना, त्याने गुपचुप तिच्याकडे पहिले. खरचं खुप सुंदर होती ती. या आधी तिच्या इतकी लावण्यवती सुंदरी त्याने कधी पाहिल्याचे त्याला आठवत नव्हते. तो आपल्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यावर तिने लाजून त्याच्याकडे पाहत एक मंद हास्य केले. त्याने सुद्धा थोडेसे मंद हास्य करुन तिला प्रतिसाद दिला. तितक्यातच ती त्याच्या नजरेआड झाली. त्यामुळे तो पुन्हा एकटाच मार्ग शोधत चालू लागला. बराच वेळ चालल्यानंतर त्याला समोर माणसे दिसू लागली. तसा तो त्यांच्या दिशेने चालू लागला. जसा तो त्यांच्या जवळ पोहोचला तसा तो खूप घाबरला. त्याच्या समोर उभ्या असलेल्या त्या माणसांचे सर्व शरीर सामान्य माणसांसारखेच दिसत असले तरी त्यांचा चेहरा खूपच विचित्र आणि भयंकर दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर ना डोळे होते, ना कान, नाक तोंड होते. पण डोक्यावर केसं मात्र होती. अशा प्रकारचे विचित्र शरीर असणारी माणसे, तो पहिल्यांदाच बघत होता. त्यांना बघून तो खुप घाबरला होता. घाबरुन तो त्यांच्यापासून दूर पळू लागला. ती माणसे त्याला आता दिसेनाशी झाली होती. तोच समोरुन त्याला रेड्यांचा मोठा ताफा त्याच्या दिशेने येताना दिसला. हजारोंच्या संख्येने धावत येणारे रेडे बघुन तो पुन्हा दुसया दिशेला धावू लागला. ते रेडे जणू त्याचाच पाठलाग करण्याच्या दृष्टीने धावत होते असे त्याला वाटू लागले. अचानक समोर इतके रेडे बघुन तो खुपच घाबरला होता. ते रेडे धावत येऊन आपल्याला त्याच्या खुरांखाली चिरडून टाकतील असे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. त्यामुळे आता तो रस्ता सोडून, रस्त्यालगतच्या घनदाट अशा जंगलाच्या आतमध्ये शिरला.

तिथली झाडे भरपूर उंच वाढलेली होती. मध्ये-मध्ये मोठ-मोठ्या वेली आणि जागो-जागी चित्र-विचित्र काटेरी झाडे होती. अशा घनदाट जंगलातून मार्ग काढणे जवळ-जवळ अशक्य असे काम होते. पण त्यावेळी त्यांच्याकडे त्या जंगलातून मार्ग काढण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.

अजूनही सूर्य मावळायला बराच उशीर होता. अंधार पडायच्या आत त्याला त्या जंगलातून बाहेर पडायचे होते. पण ते अशक्य आहे, हे तो जाणून होता. त्यामुळे अंधार पडेपर्यंत शक्य होईल तितके अंतर त्याने त्या जंगलातून पदक्रांत केले. सकाळपासून चालून-चालून तो खूप थकला होता. त्यामुळे त्याने आरामासाठी एक जागा निवडली. त्याचाकडील चामडी पिशवीमध्ये अजूनही बरेच पाणी शिल्लक होते. त्यामुळे त्याला पाणी शोधण्याची गरज नव्हती. विश्रामासाठी जागा निवडल्यावर, त्याने सुकलेल्या झाडांच्या फांद्या तोडून त्याच्यापासून अग्नी निर्माण केला. हा अग्नीच त्याचे जंगली प्राण्यांपासून रात्रभर संरक्षण करणार होता. चालता-चालता त्याने थोडीफार जंगली फळेही जमा केली होती. ती खाऊन तो तेथेच आडवा पडला. थकव्यामुळे त्याला गाढ झोप लागली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Sayali Raje

Dear team Bookstruck. Please provide more such stories.

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to नागमणी एक रहस्य


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
अजरामर कथा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
झोंबडी पूल
श्यामची आई
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
पैलतीराच्या गोष्टी
रत्नमहाल
 भवानी तलवारीचे रहस्य