भक्तांची आवडी धरोनी हृषीकेशी । उभा पंढरीसी विटेवरी ॥१॥
नामदेवासाठीं दूध पिये वाटी । मिराबाईचें घोटी विष स्वयें ॥२॥
जनीचिया संगे दळूं कांडूं लागे । चोखामेळ्या संगे ढोरे वोढी ।३॥
वंका म्हणे ऐसा भक्तांचा आळुका । ज्ञानियाची देखा भिंत वोढी ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.