कौतुकें आनंदे लोटल कांही काळ । तों आलें असे फळ प्रसादाचे ॥१॥
चोखीयाची कांता जालीसे गर्भीण । लागलासे पूर्ण नववा मास ॥२॥
स्वभावे विनंती करी पतीलागीं । घरीं नाही सामोग्री कैसी करूं ॥३॥
वंका म्हणे ऐसी ऐकोनियां मात । निघाला त्वरित बहिणी घरा ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.