जें सुख ऐकतां मन तें निवांत । तेंचि मूर्तिमंत विटेवरी ॥१॥
साजिरें गोजिरें श्रीमुख चांगले । कर मिरवले कटावरी ॥२॥
समचरण दोनी शोभती पाउले । ध्यान मिरवले पंढरीये ॥३॥
आनंदी आनंद सुखाचा सुखराशी । घाली चरणासी वंका मिठी ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.