इतुक्यामाजी चोखा घरासी तो आला । वृत्त्तांत निवेदिला सोयराई ॥१॥

येरु म्हणे हें काय अनुचित केलें । बोल ते लाविले आपणासी ॥२॥

जातिचे तो महार जग जाणताती । आपुली फजिती आपुल्या हातें ॥३॥

कासयाचा पुत्र कोणाचा तो कोण । आपुले कारण साधीं आधीं ॥४॥

वंका म्हणे ऐसे बोल ते ऐकोनी । सोयर चरणीं घाली मिठी ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel