पांडुरंगावाचोनी दुजा कोण सखा । निर्वाणीचा देखा मायबाप ॥१॥
तारीतासे एका नावासाठी जगा । ऐसा हा पै वा श्रेष्ठाचार ॥२॥
गणिका गजेंद्र यासी उध्दरिलें । प्रत्यक्ष तारिलें अजामेळा ॥३॥
वंका म्हणे ऐसा आहे हा भरवंसा । मज तंव सर्वेशा विठोबाचा ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.