भांबावोनी प्राणी संसारी गुंतले । माझें म्हणोनि श्रमले भवनदी ॥१॥
नामाची सांगडी न बांधिती कोणी । चौर्यांशीची खाणी भोगताती ॥२॥
आपुला आपण झाला असे वैरी । हिंडे दारोदारी भिक मागा ॥३॥
वंका म्हणे नाम सांडोनी विठ्ठल । वाचे बोलती बोल वाउगची ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.