मग पंढरीराणा बोलतसे वाणी । आलों मी दुरोनी येचि मार्गे ॥१॥
क्षुधा मज बहु लागली साजणी । देई कांही आणोनी फराळासी ॥२॥
येरी म्हणे आम्ही नीच याती महार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥
येरू म्हणे माझा जाऊं पाहे प्राण । यातीसी कारण नाहीं मज ॥४॥
कांही तरी अन्न असेल शिळे मिळें । देई येची वेळे लवकरी ॥५॥
वंका म्हणे ऐसे लाघव श्रीहरी । करोनी पसरी हात पुढें ॥६॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.