आधींच निर्मळ वदन सोज्वळ । विठोबा दयाळ पंढरीये ॥१॥
समचरण गोड गोजिरी पाउलें । कर मिरवले कटवरी ॥२॥
ध्यान दिगंबर तुळशीमाळा गळा । पांघुरला पिंवळा पीतांबर ॥३॥
वंका म्हणे सर्व सुखाचे आगर । तो हा विटेवर विठ्ठल देवो ॥४॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.