अखंड नामस्मरणाने प्रत्यक्ष मृत्यूलाही काही दिवस थोपवून धरण्याचे विलक्षण सामर्थ्य मनुष्यामध्ये निर्माण होऊ शकते ! या संदर्भात डॉ. रामकुमार करौली यांनी 'कादंबिनी' या हिंदी मासिकाच्या नोव्हेंबर १९८२ या अंकात सांगितलेली एक सत्यकथा वाचकांना खरोखरच आश्चर्यकारक वाटे ! ते लिहितात, "प्रसिद्ध योगिनी मा आनंदमयी यांचा मला बराच सहवास घडला. त्यांच्या आश्रमातील रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी मला नेहमीच जावे लगे. एरव्हीदेखील त्यांची व माझी अनेकदा भेट होई. एकदा त्यांनी मला श्रीसंत हरीबाबा यांची प्रकृती तपासण्यासाठी आश्रमात बोलावले. संत हरीबाबांवर त्यांचे विशेष प्रेम होते. कारण ते एक उच्च कोटीतले संत होते; परंतु संत हरीबाबांना हृदयविकाराचा त्रास होता. मांच्या आज्ञेनुसार संत हरीबाबांची प्रकृती तपासण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या सहवासात मला अपूर्ण शांतीचा अनुभव आला. पुढे ईश्वर कृपेने त्यांची प्रकृती लवकरच सुधारली; परंतु दोन वर्षानंतर त्यांना रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. हा विकार असाध्य होता व त्यातून ते बरे होतील असे मला मुळीच वाटले नाही. 'संत हरीबाबांची प्रकृती तपासण्यासाठी व त्यांना औषध देण्यासाठी मी अधूनमधून त्यांच्याकडे जात असे. त्यावेळी संत हरीबाबा सतत "श्रीराम जयराम जय जय राम" असे नामस्मरण करीत असायचे. त्यावेळी ते दिल्लीतील 'सिव्हील लाईन्स' मध्ये राहत होते. अखंड नामस्मरण हे त्यांचे एक वैशिष्टय होते. पुढे एक दिवस मला फोनवरून एक अपेईय वार्ता कळवण्यात आले, "बाबा बेशुद्ध आहेत ताबडतोब निघून या." अशी ती वार्ता होती! मी ताबडतोब माझ्या गाडीतून बाबांच्या घराकडे निघालो. तेथे गेल्यावर मी पहिले बाबांनाच श्वास मंद झाला असून त्यांची नाडीही हाताला लागत नव्हती! त्यावेळी बाबा पूर्णपणे बेशुधावस्थेतच होते; परंतु त्यांचे ओठ मात्र हळूहळू हलत होते. आणि त्यातून "श्रीराम जयराम जय जय राम" हा मंत्रध्वनी बाहेर पडत होता ! ते पाहून मला आश्चर्य वाटले ! त्यानंतर त्यांची स्थिती अधिकच गंभीर झाली आणि ते आता अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ जगू शकतील असे मला मुळीच वाटेना ! तरी पण मी त्यांना भराभर हकी इंजक्शने दिली. मशिनच्या सहाय्याने त्याचं श्वासोच्छ्वासही सुरु ठेवला; परंतु एक तास उलटला तरी त्यांच्या स्थितीत मला काहीच सुधारणा दिसली नाही. त्यामुळे मी बाहेर वाट पाहत बसलेल्या सर्वाना सांगून टाकले, कि " बाबा आता फार काळचे सोबती नाहीत! " कारण त्यावेळी बाबांचे हृदय हळूहळू बंद पडण्याच्याच मार्गावर होते! माझे ते मत ऐकून सर्वांचेच चेहरे शोकाकुल झाले आणि त्यांपैकी काहींनी तर यमुना नदीवर जाऊन त्यांच्या अंत्यविधीची तयारीदेखील सुरु केली ! बाबांच्या प्रकृतीबाद्दलची हि हकीकत मांना लगेचच फोन केला. तेव्हा मांनी फोनवर कळविले, की "मी लवकरच येते,तोपर्यंत सर्व लोकांना 'हनुमान चालीसा' चे पाठ करायला सांगा." त्यावेळी माझ्या मनात आले, मां इथे येईपर्यंत बाबांचा बहुतेक स्वर्गावासच झालेला असणार ! आणि झालेही तसेच ! मां येण्यापुर्वीच बाबांनी देहत्याग केला ! बाहेत 'हनुमान चाळीश' चे पाठ जोरात सुरु होते. तेवढ्यात गाडीचा आवाज आला आणि मां घाईघाईने घडीतून उतरल्या. त्यांना पाहताच मी म्हणालो, "मां, आपले बाबा तर मघाच गेले !" ते माझे शब्द ऐकूनही मां म्हणाल्या, "मला बाबंझ्ही थोड बोलायचं आहे. तुम्ही सर्व लोक खोलीच्या बाहेर जा." त्यांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सर्वजण खोलीच्या बाहेर गेलो. मग मांनी दरवाजा आतून घटत लावून घेतला. बाबा तर केव्हाच समाधिस्थ झाले होते. मग आता मां त्यांच्याशी कश्या बोलणार, याचे कोडे मला काही केल्या उलगडत नव्हते ! एक एक क्षण मला तासासारखा वाटत होता. शेवटी पुन तासानंतर खलीच दरवाजा हळूच उघडला गेला आणि मां हसत हसत बाहेर आल्या. मला काहीच समजेना. मी वेड्यासारखा मांच्या चेहऱ्याकडे पाहताच राहिलो ! तेवढ्यात मां म्हणाल्या, "बाबांनी आपले म्हणणे ऐकले, बाबा एवढयातच जात नाहीत !" माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. मां काय म्हणतात तेच मला समजेना ! म्हणून मी तसाच घाईघाईने बाबांच्या खोलीत घुसलो आणि पाहतो तो काय ! बाबा तक्क्याला टेकून आरामशीरपणे बसले होते. मला पाहताच तर त्यांच्या चेहऱ्याचे दैवी हास्य उमटले ! मी त्यांची तपासणी केली. हृदय, नाडी, श्वास, सर्व काही अगदी व्यवस्थित होते ! तेवढ्यात मां म्हणाल्या, " तुम्ही आता घाबरू नका. बाबांनी जाने लांबणीवर टाकले आहे !" दोन दिवसानंतर मी बाबांना घेऊन मांच्या आश्रमात गेलो. तेथे तर बाबा चक्क पूर्वीसारखेच हिंडू फिरू लागले ! पुढे चार महिने उलटल्यावर बाबा म्हणाले, "आता बनारसला जाईन म्हणतो......" मी बाबांना म्हटले, " तुमची प्रकृती एवढयातच सुधारली आहे, तुम्ही इतक्या दुरचा प्रवास सध्या करणे ठीक नव्हे." परंतु मां म्हणाल्या, "त्यांची इच्छा आहे तर तुम्ही त्यांना नाही म्हणू नका." आणि त्याप्रमाणे एका डॉक्टरला सोबत देऊन बाबांना बनारसला पोहचविण्यात आले. परंतु बाबा बनारसला पोहचले त्याचा दिवशी रात्री दोन वाजता मला बनारसहून एक ट्रंककॉल आला. त्यात " बाबा समाधिस्थ झाले " एवढीच बातमी होती ! हे सारे कसे घडले ते मला सांगता येणार नाही. आमच्या वैदयकशास्त्रात तरी याला उत्तर नाही; परंतु का सारा नामस्मरणाचाच चमत्कार असावा असे मला निश्चितपणे वाटते ! आणि यात कोणतीही सांक घेण्याचे कारणही नाही. ही सत्य प्रचीती आहे. शोध दैवी शक्तींचा - In The Search of God's photo.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel