वास्तुपुरुष ब्रह्मदेवाने हे घराच्या रक्षणकर्त्याच्या रूपात वास्तुपुरुष कल्पिलेला आहे. भूमिपूजन करताना, मुख्य दरवाजा (चौकट) बसवताना, गृहप्रवेशाच्या वेळी वास्तुपुरुषाची शांती किंवा पूजाअर्चा केली जाते. प्राचीन ग्रंथात वास्तुपुरुषाच्या उत्पत्तीविषयी काही आख्यायिका सांगितल्या जातात. त्याच्यातल्या काही पुढीलप्रमाणे आहेत :- 1. त्रेतायुगात एक मोठे भूत तयार झाले. त्याने सगळ्यांना त्रास देण्यास सुरवात केली. हे पाहून इंद्रादी सर्व देवता घाबरले आणि ब्रह्मदेवाजवळ त्याला शांत करण्याचा उपाय विचारण्यासाठी गेले. ब्रह्मदेवाने सांगितले, की त्याला पृथ्वीवर उलटे झोपवा. महाप्रयासाने देवांनी त्याला उलटे झोपवले व त्याच्या प्रत्येक अंगावर देवाने आपले स्थान बनवले. तेव्हा त्या राक्षसाने ब्रह्मदेवाला व्याकुळ होऊन विचारले की ''हे देवा आता माझे भोजन काय असेल?'' त्यावर ब्रह्मदेवाने सांगितले की जो कोणी व्यक्ती घर किंवा कोणतीही वास्तू बांधेल त्यापूर्वी तो तुझ्यासाठी हवन-पूजन करेल त्यात अर्पण केलेल्या सामग्रीला तू भक्षण कर आणि जो तुला हवन देणार नाही त्याच्या वास्तूलाच तू भक्षण कर म्हणूनच त्यानंतर वास्तुशांती प्रचारात आली. 2. पूर्वीच्या काळी अंधवधाच्या वेळी शंकराच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले त्यापासून एक भीषण व अक्राळविक्राळ प्राण्याची निर्मिती झाली. तो पृथ्वीवर पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला पिऊ लागला. पृथ्वीवर एकही थेंब रक्त शिल्लक राहिले नाही तेव्हा तो शंकराची तपश्चर्या करू लागला. शंकराला प्रसन्न करून त्याने तिनंही लोकांना संपवण्याचा वर मागितला. तेव्हा घाबरून देवांनी त्याच्या अंगावर उड्या घेतल्या आणि त्याच्या ज्या अंगाचा ताबा ज्या देवतेने घेतला त्यालाच आपले स्थान बनवले. त्या दबलेल्या प्राण्याने परत शंकराची प्रार्थना केली. देवांच्या या कृतीने मी मरून जाईन माझी भूक शांत करायचा काही उपाय सांगा. तेव्हा शंकराने त्याला वास्तुशांतीच्या वेळी वाहिली जाणारी सामग्री भक्षण करण्यास सांगितले आणि हे सांगितले की जे वास्तुशांती करणार नाहीत ते ही तुझे भक्ष्य होतील. याच प्राण्याला वास्तुदेवता किंवा वास्तुपुरुष म्हणतात आणि तेव्हापासून वास्तुशांतीस सुरवात झाली. काही वेगळ्या कथा पण प्रचलित आहेत. सर्व कथांमध्ये सांगितलेला वास्तुपुरुष एकच आहे. त्याला भवन-निवेशामध्ये वेगवेगळ्या प्रकार कल्पिलेले आहे. वास्तुपुरुषाच्या शरीर-संस्थानात गुण आणि दोष दोन्ही मानले आहे. वास्तुपुरुषाचे विभाजन भवन-विशेषच्या योजनेनुसार कल्पलेले आहे. वास्तुपुरुषाचे चरित्र :- जसे दंतकथेत सांगितले आहे तशीच वास्तुपुरुषाची प्रतिमा राक्षस रूपात रेखाटली आहे. त्यानुसार त्याचे तीन प्रमुख चरित्र मानले जातात. 1. चर वास्तू 2. स्थिर वास्तू 3. नित्य वास्तू चरवास्तू :- वास्तुपुरुष पालथा झोपलेला आहे. तो आपल्या जागेवरून दर तीन महिन्यात दिशा बदलतो जिथे वास्तुपुरुषाची दृष्टी असते तिथे काम सुरू करणे मुख्य द्वार बनवणे शुभ असते. स्थिर वास्तुपुरुष : - स्थिर वास्तुपुरुषाचे डोके नेहमी ईशान्य दिशेला असते आणि पाय नैरृत्य दिशेला असतात. हात वायव्य दिशेला असतात. डावा हात आग्नेय दिशेला असतो याच आधारे घराचे नियोजन करताना पदविन्यास करून देवतांना विराजमान करतात तसेच पूर्व, उत्तर, ईशान्य दिशेला मोकळे ठेवले जातो, किंवा खिडकी दरवाजे बनवले जातात कारण वास्तुपुरुषाचे तोंड ईशान्य दिशेला असते. दंतकथेत असे मानले गेले आहे की, चर वास्तू दिवसातून एकदा तथास्तु म्हणते आणि त्यावेळी बोललेली गोष्ट सत्य होते. म्हणून म्हटले जाते की, घरातल्या व्यक्तींनी नेहमी चांगले व शुभ बोलले पाहिजे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel