काफीखान आणि इतर इतिहासकारांनी शिवाजीच्या स्त्रीदाक्षिण्याबद्दल भरभरून लिहिले आहे.

इंग्रजी फॅक्टरी रेकॉर्ड्‌समध्ये म्हटले आहे की शिवाजी स्त्रियांना अभय देतो हे सर्वश्रुत असल्याने युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर शत्रुपक्षातील मातब्बर माणसे स्त्रीवेष घालून पळून जात.

शिवाजीच्या समकालीन इंग्रज, डच, फ्रेन्च, पोर्तुगीज आणि इटालियन प्रवाशांनी शिवाजीची तुलना जगाच्या इतिहासात अजरामर झालेल्या ॲलेक्झांडर, हॅनिबल, ज्युलियस सीझर, सरटोरियस यांच्याशी केली आहे. पण या थोर व्यक्तींमध्ये शौर्याव्यतिरिक्त दोषही होते. शिवाजी सर्वगुणसंपन्‍न होता. शिवरायांचे शौर्य, कल्पकता, संघटनाकौशल्य, राजधर्मपालन, स्त्रीदाक्षिण्य इत्यादी गुणांनी पाच शतके पारतंत्र्यात पडलेल्या देशास स्वातंत्र्य मिळवून दिले. पाश्चात्त्य राज्यकर्त्यांमध्ये दिसून येणाऱ्या राज्यलोभ, आसक्ती, व्यसनाधीनता, द्वेष, लंपटपणा अशा अवगुणांपासून शिवाजीचे जीवन अलिप्त होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel