Vātsyāyana
0
गर्भावस्था गाईड
Featured

जब भी कोई भी स्त्री गर्भधारण करने का विचार करती है तो सबसे पहले उसे डॉक्टर से अपने स्वास्थ्य की जांच करवा लेनी चाहिए और यह मालूम करना चाहिए की क्या वह पूरी तरह स्वस्थ है और एक स्वस्थ बच्चे को जन्म दे सकती है।

शिवाजी महाराज
Featured

छत्रपती शिवाजीराजे भोसले हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

शहाजीराजे भोसले

शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.

जिजाबाई शहाजी भोसले

जिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, माँसाहेब, इत्यादी) (इ.स. १५९८ - १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

बाजी प्रभू देशपांडे

बाजी प्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले.

जिवा महाला

जिवा महाला हा शिवाजीराजांचा अंगरक्षक होता, त्याने प्रतापगडाच्या लढाईत शिवाजींना वाचवले होते.

तानाजी मालुसरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांंच्यासह असलेले तानाजी मालुसरे हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत सहभागी असलेली व्यक्ती आहेत.

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादी

शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांची यादी खाली दिल्याप्रमाणे आहे. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे, तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे.