पार्श्वभूमी

शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा नोव्हेंबर १० १६५९ रोजी वध करून त्याच्या सेनेचा प्रचंड धुव्वा उडवला व काही दिवसातच अतिशय आक्रामक भूमिका घेउन अनेक किल्ले आपल्या अखत्यारीत घेतले. डिसेंबर १६५९ मध्ये शिवाजी महाराज कोल्हापूर नजीक पन्हाळ्यानजीक पोहोचले व याच सुमारास अदिलशाही सरदार रुस्तमजमान मिरजेपाशी पोहोचला.

लढाई

रुस्तमजमान कडे अनेक मातब्बर सरदार होते फ़ाजलखान, मलिक इत्बार, सादतखान, याकुबखान, हासन खान, संताजी घाटगे इत्यादी व त्याचे सैन्यबळही मोठे होते. शिवाजी महाराजांच्या सेनेत नेताजी पालकर , हणमंतराव खराटे, हिरोजी इंगले, भिमाजी वाघ इत्यादी सरदार होते.

शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत असे कळाल्यानंतर पन्हाळ्यावर आक्रमणकरण्याच्या बेतात रुस्तमजमान होता. परंतु २८ डिसेंबरला पहाटेच अचानकपणे शिवाजी महाराजांनी रुस्तमजमानच्या सेनेवर जोरदार हल्ला चढवला. पुर्ण जोरदार हल्ला न चढवता पुढून मागून आजूबाजूने तुकड्यांनी हल्ले चढवले व आदिलशाही सेनेला नामोहरम केले. रुस्तमजमान रणांगण सोडून पळून गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel