आरती रामाची (काशिराजकृत).
द्युमणि - अन्वय - भूषण दूषण - हरा । ब्रम्हा विष्णू शंकर यांहूनी परा ॥
काम निशाचर - मारण हरिहरां वरा । सर्वोत्तमा रामा रणरंगधीरा ॥
जयदेव जयदेव जयरघुवंशाभरणा । अचिंत्या अरूपा न कळेसी मना ॥
स्वयें सिद्ध येथें कैची भावना । आत्मरूपा रामा न कळेसी जना ॥ज० ज०॥१॥
आरती करूं तव सर्वही आरतें । जड सर्वही रामा तुजवरी भासतें ॥
सर्वाधिष्ठान तूं सर्वां परतें । ब्रम्हा स्वयं येती स्वयें भासतें ॥ज० ज०॥२॥
कल्पित आरति करी रघुवीरा आतां । आरति ओवाळूनी पाहीन परता ॥
निरसूनी भवव्यथा सुखरूपत्वता । पावन गुरूकृपें रूप तुझें आतां ॥ज० ज०॥३॥
पंचभूत देह तें पात्र करुनी । इंद्रियें हया वात्या वरि ठेवोनी ॥
पंच विषय पांच वाती घालोनी । जाळिन रात्रीदीन तें तुज लागोनी ॥ज० ज०॥४॥
भक्तिरसें भरलें मन माझें घृत । घालुनि पंच दिवे ओवाळूं म्हणत ॥
ज्योती नाहीं ज्यासी जडचि तें बहुत । तुज वेगळा प्रकाश नाहीं किंचीत ॥ज० ज०॥५॥
सिद्ध स्वयं ज्योती तुझीच लावोनी । प्रकाशक दीप स्वयें हौनी ॥
ओवाळीन रामा तुज लागोनी । तुझा तूची देवा तोष पाव मनीं ॥ज० ज०॥६॥
ओवाळावयालागीं न दिसे कांहीं । एकरूप सर्वहि तूंचि एक पाही ॥
कल्पित सर्वहि हें तुजवेगळें नाहीं । तूंचि सत्य रामा जग कांहीं नाहीं ॥ज० ज०॥७॥
जाणुनि अर्थ पठण करी जो आरती । चित्तशद्धी पावे ब्रम्हा - संविती ॥
जननी - दु:ख - जठर न पवे संसृती । स्वयें हौनी राम निरसूनी भ्रांति ॥ज० ज०॥८॥
काशीरंगनार्थें उजळिली आरती । माया अंध:कार निरसूनी भ्रांती ॥
रामरूप झाला स्वयें निश्चिती । विनवी संतां ऐशी करा हो आरती ॥ज० ज०॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.