श्रीगणेशायनम: ॥ कोणे एके अवसरीं ॥ श्री जयराम ब्रम्हाचारी ॥
आनंदमूर्तीं बरोबरी । नागठाण्यास पातले ॥१॥
उत्तर - वाहिनी कृष्णावेणी । कांहीं दिवस तेथें राहुनी ॥
स्नान - जपध्याना संपादुनी । काळ क्रमावा हा हेतू ॥२॥
तेथें ब्राम्हाणी एक असे । तदगृहीं राहती वस्तीस ॥
सतत जाऊनि कृष्णेस । संपादिती स्नान संध्या ॥३॥
मध्यान्ह पर्यंत उभयतांनीं । कृष्णातीरीं वेळ क्रमोनी ॥
भोजना यावें मध्यान्हीं । वृद्ध - ब्राम्हाणी - गृहासी ॥४॥
ऐसे दिवस दोन गेले । तेथील ग्रामस्थां जाणवलें ॥
कोणी हे सत्पुरुष असती वहिले । भेटीस आले सुश्रद्धें ॥५॥
नमस्कारिल्या उभय मूर्ती । आदरें पुसिलें तयांप्रती ॥
उदरनिर्वाह कोणे रीतीं । संपादितां या स्थळीं ॥६॥
येरीं कथिलें यथार्थ । दोन दिवस आम्ही येथें ॥
वृद्धा ब्राम्हाणीचे गृहांत । भोजन सारिलें संतोषे ॥७॥
इत:पर भिक्षाटण । काळ क्रमूं स्वेच्छें करून ॥
ग्रामस्थीं हें परिसोन । बोलते झाले तयांप्रती ॥८॥
भिक्षा न कीजे स्वामी । निर्वाह - सामुग्री पुरवितो आम्ही ॥
वृद्धा ब्राम्हाणीचे घरीं तुम्ही । मनेच्छा स्वस्थ राहावें ॥९॥
मग त्या गृहीं जाण । ग्रामस्थीं डाळ पीठ नेऊन ॥
द्यावें प्रत्यहीं पोंचऊन । भक्ति - पुर:सर आवडी ॥१०॥
बाईचे गृहीं म्हौस एक । तानपी दुभतें सुरखे ॥
दधि दूध ताक । वाढिते ब्राम्हाणां प्रत्यहीं ॥११॥
तक्र लोणी यथेष्ट । प्रीति - पुर:सर संत श्रेष्ठ ॥
सेवन करोनि सुखसंतुष्ट । निरत स्वकर्मीं प्रतिदिनीं ॥१२॥
एके दिवशीं आनंदयोगी । बोलले त्या बाईलागीं ॥
म्हौस नेतों आम्हांसंगीं । रेडकासहित कृष्णेस ॥१३॥
स्नान संध्या करूं स्वस्थ । म्हौस चरेल बेटांत ॥
येते समयीं वत्सासहित । विश्वामित्री गृहा आणूं ॥१४॥
अवश्य म्हणे ती ब्राम्हाणी । रेडकासहित म्हौस घेवोनी ॥
स्नाना गेले महामुनी । उत्तर- वाहिनी कृष्णेचे ॥१५॥
स्नान सारोनि सावकाश । बैसले संध्या जपास ॥
म्हौस सोडिली चरावयास । रेडकासहित बेटांत ॥१६॥
सारूनिया जप ध्यान । ब्रम्हानंदीं वृत्ती मग्न ॥
म्हौस आणावी हें स्मरण । राहिलें नाहीं तयांतें ॥१७॥
गृहा येतां राजयोगी । ब्राम्हाणी पुसे तयांलागी ॥
म्हौस आणिली नाहीं संगीं । वत्सासहित किमर्थ ॥१८॥
येरीं कथिलें यथार्थ । बरी बांधिली बेटांत ॥
नैवेद्य जाहलिया तयेतें । घेऊन येऊं त्वरित गती ॥१९॥
मग भोजन सारोन वहिलें । वामकुक्षीं विश्रमले ॥
स्वल्प वेळां आणों गेले । महिषीलागीं नदी - तटा ॥२०॥
तों कृत्य ओखटें झाले । रेडकूं वृकानें मारिलें ॥
एकटया महिषीतें लक्षिलें । नदीपाशीं वरडतां ॥२१॥
चित्तांत खेद अत्यंत झाला । हा प्रमाद असे घडला ॥
दुर्निमित्ताचा लगटला । तुबंळ शब्द निजांगा ॥२२॥
होणार जें बळवंत । कदाकाळीं न चुकत ॥
मग एकटया महिषीतें । आणिते झाले बिराडीं ॥२३॥
पुसे घरची म्हातारी । एकटी म्हैस आणली घरीं ॥
रेडकूं न दिसे बरोबरी । कसें काय जाहलें ॥२४॥
येरीं कथिलें यथार्थ । वृद्धा कोपली अत्यंत ॥
मग दुर्भाषणें करी त्यांतें । मर्यादा कांहीं न राहिली ॥२५॥
धार काढावया सायंकाळीं । भुसाची पाटी पुढें ठेविली ॥
वृद्धा ब्राम्हाणी समीप गेली । भांडे घेवोनि धारेचें ॥२६॥
स्तनासी लावितांचि कर । महिषीनें केला लत्ताप्रहार ॥
धारेचें पात्र तेथोनि दूर । उसळोन पडलें एकीकडे ॥२७॥
वृद्धा दीर्घ स्वरें रडे । आनंदमूर्तींस पडलें कोडें ॥
महिषी सन्निध निवाडें । आनंदमूर्ती पातले ॥२८॥
महिषीवरून कृपाहस्त । फिरवोन तियेतें बोलत ॥
मृत्यु संहार हा निश्चित । जन्म मरण दु:खमूळ ॥२९॥
ज्या प्राणियें जन्मास यावें । तेणें निश्चयें मरावें ॥
मरोन पुन्हां जन्म घ्यावें । परिहार दुजा नसे यया ॥३०॥
आतां अपत्य तुझें मेलें । चित्त शोकाकुलित झालें ॥
विवेकें शोक त्यागोन वहिल । धैर्य देई चितास ॥३१॥
आम्ही सांगोन या वृद्धेस । रेडकूं नेलें चरावयास ॥
तेथें विपरीत वर्तलें ऐसें । अपेश आलें आम्हांवरी ॥३२॥
आतां सकल शोक टाकून । बाईलागीं दूध देणें ॥
ऐसें ऐकून संभाषण । विवेक झाला महिषीस ॥३३॥
साधूंचा महिमा अधाध । महिषीप्रति झाला बोध ॥
निर्व्यलीक निर्द्वंद्व । अंतर जाहलें निर्मळ ॥३४॥
तियेस फुटली मानवी वाचा । म्हणे स्वामी अपल्याचा ॥
खेद अंतरीं दु:खाचा । कडा मजवरी कोसळला ॥३५॥
आपण वदलां विवेक - गोष्ट । तेणें मन झालें संतुष्ट ॥
दयावंत साधु तुम्ही श्रेष्ठा । आज्ञा नुल्लंघीं यावरी ॥३६॥
बाईलागीं दुग्ध देईन । धार काढिजे आपण ॥
प्रांजल असे शब्द बोलून । मौन महिषीनें वरियेलें ॥३७॥
स्वकरीं घेवोन धारेचें भांडें । स्वयें गेले महिषीकडे ॥
आंबोणपाटी ठेवोनी पुढें । स्तना करकंज लाविला ॥३८॥
पान्हा दाटला स्तनांतरीं । दूध दिलें भरणभरी ॥
आणखी धारेस दुसरी । चरवी स्वामियें मागितली ॥३९॥
तेंहीं भरोन दूध काढिलें । प्रत्यहींच्या दुप्पट निघालें ॥
भूस बाटूक घातलें । रात्रीं पुष्कळ महिषीपुढें ॥४०॥
तशीच प्रात:काळीं धार । स्वामींनीं काढिली आपुल्या करें ॥
दूध दोन भरणेंभर । रात्री ऐसेंच निघालें ॥४१॥
तया महिषीप्रती । स्वयें बोले आनंदमूर्ती ॥
इत:पर सोडोनिया खंती । परमार्थीं सावध होई तूं ॥४२॥
पुन्हा गर्भवती न व्हावें । दूध देतां न रहावें ॥
ऐसें करीत स्वभावें । आयुष्य जावें सन्मार्गीं ॥४३॥
इहलोकीं जीव सुखांत । परत्रीं उत्तम लोक प्राप्त ॥
श्रीगुरुकृपाबळें तूतें । सद्नती होईल निश्चयें ॥४४॥
अवश्य म्हणोन विश्वामित्री । संतोषोनिया अंतरीं ॥
प्रत्यहीं दुग्ध भरणभरी । देवों लागली वृद्धेतें ॥४५॥
दूध आणोन बाईस दीधलें । आश्चर्य तीतें वाटलें ॥
म्हणे काय कैसें जाहलें । इश्वरी कृत्य कळेना ॥४६॥
मनीं म्हणे सत्पुरुष असती । करस्पर्श जाहला महिषीप्रती ॥
लीला अगम्य सांगती । सत्य प्रत्यया आजि आलें ॥४७॥
मग दुसरे दिवशीं जाण । पुढें ठेवितां अंबाण ॥
वृद्धा महिषीतळीं जावोन । धार काढूं बैसली ॥४८॥
पान्हा दाट्ला स्तनांतरीं । धार काढोनी भरणभरी ॥
दुसरें आणोन झडकरी । तेधवां पात्र भरियेलें ॥४९॥
मग त्या बाईच्या मनांतील । क्रोध जावोनि झाली शीतळ ॥
म्हणे हे सामर्थ्य आपलें । आर्ष भोळी मी नेणे ॥५०॥
न्यूनाधिक बोलले तुम्हां । तें तें सर्व करोनि क्षमा ॥
ऐसें बोलून चढता प्रेमा । स्वामीवरी वाढविला ॥५१॥
जितुके दिवस तेथें होते । तंवपर्यत नित्यानित्य ॥
पायस करोनी तयांतें । अतिप्रीतीनें बोगरी ती ॥५२॥
मग तेथोन संत मंडळी । जावों निघाली आपुले स्थळीं ॥
बाईस बोलिले ते वेळीं । कृपावचन ऐका तें ॥५३॥
महिषीचें पोटास वैरण । पुष्कळ मात्न घालोन ॥
निगा दास्त राखोन । दुग्ध घ्वावें यथेष्ट ॥५४॥
तिचा तुमचा आत्मा पाही । जंववर असे या देहीं ॥
तों सगर्भ होणार नाहीं । दुग्ध उणें न होय ॥५५॥
ऐसें तया बाईलागीं । सांगोन गेले आनंद योगी ॥
कथा अपूर्व या प्रसंगीं । दुजी श्रोतियें परिसावी ॥५६॥
कोणे एके दिवशीं । शहर हैदराबादासी ॥
केशवस्वामी कीर्तनासी । उभे ठाकले स्वैच्छें ॥५७॥
प्रमुख दैवत वृंदावन । त्यांचिये गुरुचें समाधिस्थान ॥
तेथें होतसे कीर्तन । श्रोते अपार मिळाले ॥५८॥
कीर्तनामाजी सारांश । वर्णिलें गुरुमाहत्म्य विशेष ॥
उपमा लोहो परिसास । देती गौणपक्ष हा ॥५९॥
कीटी - भृंगी - न्यायें जाणा । कृपावंत श्रीगुरूराणा ॥
स्पर्शें तात्काळ आपणा । ऐसें करिती निश्चयें ॥६०॥
आनंदाची भरोनि सृष्टी । कीर्तनीं कितिएक बोले गोष्टी ॥
अनुभवीन राम तो द्दष्टी । गोचर पदार्थ हा असे ॥६१॥
एतद्विषयीं भोक्ता जाण । आनंदमूर्ती महाप्राज्ञ ॥
ऐशा समयीं महासुज्ञ । भेट करील जरी त्याची ॥६२॥
आम्ही महायात्रा दोन । केल्या असती तयांतून ॥
एक यात्रेचें सुकृत जाण । देईन भेट करील त्यातें ॥६३॥
ऐसें ऐकोन एक ग्रामस्थ । कीर्तनांतून उठला त्वरित ॥
तया आधीं ठाऊक होतें । आनंदमूर्ती आले हें ॥६४॥
केशवस्वामींस ठाऊकें नाहीं । सहज कीर्तनीं बोलिले पाही ॥
मग तया गृहस्थांहीं । धांव घेतली उल्हासें ॥६५॥
त्याचिये गृहाकारणें । आनंदमूर्ती वस्तीलागी जाण ॥
आले सायान्ह पाहून । नाम ग्राम पुसिलें तैं ॥६६॥
संगियें मंडळींनीं कथिलें । आनंदमूर्तीं हें आकर्णिलें ॥
असेल तरी हें रूप वहिलें । वळखोनिया ठेविजे ॥६७॥
ग्रामांतरीं ब्रम्हानाळ क्षेत्र । कृष्णा - वेदा - संगम स्थिर ॥
तये ग्रामीं निरंतर । वास या गुरुभक्तांचा ॥६८॥
रघुनाथस्वामींचा शिष्यावतंस । विख्यात सर्व राष्ट्रास ॥
सहज आगमन या स्थळास । जाहलें जाणा गुरुवर्या ॥६९॥
वाक्य हें कर्णां ऐकिलें । वस्तीलागी स्थळ दिधलें ॥
रात्रौ श्रवणाचे वेळे । कीर्तनासी तो गेला ॥७०॥
कीर्तनीं ऐकली गोष्ट । आनंदमूर्तींची करवील भेट ॥
महायात्रेचें सुकृत स्पष्ट । त्यास देईन निश्चयें ॥७१॥
आकर्णोनी सुपर्णा ऐसा । धांवला गृहालागी सरसा ॥
आनंदमूर्ती । सुधाघटसा । अवलोकिला द्विजवरें ॥७२॥
पाहतो तंव आनंदमूर्तीं । निद्रापन्न झाले असती ॥
ब्राम्हाण विवेकी महामती । विचार करी मनांत ॥७३॥
जरी करावा शब्दघोष । निद्राभंगाचा लागेल दोष ॥
सत्युरुषाचा संतोष । होईल ऐसें करावें ॥७४॥
कांहीं न बोलतां द्विजवर । चरण चुरितसे स्वकरें ॥
तव जागृति - प्रभाकर । श्रीमूर्ती - ह्रदयीं उगवला ॥७५॥
पाय चुरितो हा कोण । ओळखिल घरचा ब्राम्हाण ।
उठोनी पुसिलें कारण । पाय चुरितां किमर्थ ॥७६॥
नमस्कारून ब्राम्हाणें । कथिलें साकल्य वर्तमान ॥
केशव - स्वामी गुणनिधान । कीर्तनीं उभे असती पैं ॥७७॥
श्रोतयांचा बहु समाज । मिळाला असे तेज:पुंज ॥
वक्ता सुधी केशवराज । कीर्तनीं रंग बहु आला ॥७८॥
तया कीर्तनीं नामाभिधान । घेतलें केशवस्वामीनें ॥
आनंदमूर्तींची जरी कोण । भेट करील या समयीं ॥७९॥
महायात्रेचें सुकृत । त्यातें देईन मी निश्चित ॥
ऐसें ऐकोन त्वरित । धांवत आलों तुम्हांपाशीं ॥८०॥
आपणांस श्रम झाले फार । तथापि ममोद्देशें शीघ्र ॥
आळस दवडोनिया दूर । आतांचि आलें पाहिजे ॥८१॥
भेटी होईल साधूंची । इच्छा पुरेल गुरु - भक्तांची ॥
त्यमाजीं मज दीनाची । कामना पुरों शकतसे ॥८२॥
ऐशी ऐकून द्विजोक्ती । मग बोलिले आनंदमूर्ती ॥
तुम्ही सांगतां जे युक्ती । माझिये चित्ता नयेचि ॥८३॥
असे सौरस्य एक येथें । तें मी सांगेन सखया तूंतें ॥
त्यांचिया आमुच्या भेटींत । ब्रम्हानंद उचंबळेल ॥८४॥
“तया आनंदाचें रहस्य । मी अनुभवी सावकाश ॥
ऐसी पात्नता मज दीनास । देवोन सनाथ करावें ॥८५॥
यात्रा सुकृताची पाही । कामना मज सर्वथा नाहीं ॥”
ऐसें तयांपाशीं पाही । मागोन घेई द्विजवर्था ॥८६॥
ऐसें ऐकतां तटस्थ । दोंहीकडे वेधला गृहस्थ ॥
कोणत्या गोष्टीमाजीं हित । माझें मज नुमगेची ॥८७॥
विचार विवरोनि दयाळा । सांगा जाणीवेचि कळा ॥
अल्पमती ब्राम्हाण भोळा । उघडोनि डोळा पाहा मज ॥८८॥
ऐकोन दैवी संपत्ती । कृपेनें वेधले आनंदमूर्तीं ॥
भुललास यात्रेचे सुकृतीं । परि तें नोहे सुजाणा ॥८९॥
श्रीगुरुकृपा महालाभ । ब्रम्हानंदाचा अभिनव कोंब ॥
ह्रदयीं उमटे स्वयंभ । मत्सरदंभ दुरावे ॥९०॥
ऐसिया पदार्था होई पात्र । काय करिसी महायात्रे ॥
ऐसें ऐकतां तो विप्र । अवश्य म्हणे श्रीगुरो ॥९१॥
मग उभयतां कृष्णराम । जैसे जनमनोभिराम ॥
पावले कीर्तन पांडवधाम । पुसोन घाम द्वैताचा ॥९२॥
केशव स्वामी आनंदमूर्ती । पाहतां मिठी चरणावरुती ॥
दृढतर घालोनी पदाप्रती । अभिषेकिले नेत्रजळें ॥९३॥
येरें तैसेंच केलें । दंडवत चरणावर घातलें ॥
बाष्प कंठीं दाटले । चरण धुतले नयनोदकें ॥९४॥
उठोनि दोघां झाल्या भेटी । प्रेमालिंगनें पडली मिठी ॥
ते समयींचा आनंद सृष्टी - । माजी समावों शकेना ॥९५॥
मागुती ठाकले कीर्तनीं । कीर्तन - भोक्ता आनंदमुनी ॥
प्राप्त झालिया दशगुणी । आनंद जाहला प्रवृद्ध ॥९६॥
सूर्योदयावधी जाण । ते दिनीं जाहलें कीर्तन ॥
मंगलारती करून । कीर्तन समाप्त मग केलें ॥९७॥
उभयतां मग त्याच स्थळीं । बैसले साधू एके मेळीं ॥
अन्य श्रोते मंडळी । स्तोम सर्वही बैसला ॥९८॥
केशव स्वामियें स्वागतें पुसिलें । ब्रम्हानाळ कधीं सोडिलें ॥
येथें आगमन केव्हां जाहलें । कीर्तन - वार्ता कळली कैशी ॥९९॥
आनंदमूर्तीनें तयांतें । कथिलें सर्व वृत्तांतातें ॥
इतुक्यांत विप्रही तेथें । समीपच बैसला होता ॥१००॥
चरणीं ठेवोनि मस्तक । बोले जोडोनी द्वय हस्तक ॥
कीर्तनीं बोलला निष्टंक । वचन आपण गुरुवर्या ॥१०१॥
आनंदमूर्तींची भेट करी । त्यातें महायात्नेचें निर्धारी ॥
सुकृत देईन ऐसेपरी । वचन नेमस्क पैं माझें ॥१०२॥
तेंच ऐकोन स्वामिराया । विनटलों आनंदमूर्तिपायां ॥
घेवोनि आलों स्थळा या । भेटावया आपणां ॥१०३॥
आतां माझें गोमटें । तेंच करिजे मुनिश्रेष्टें ॥
म्हणोनी चरणावरी लोटे । परम भावें विप्र तो ॥१०४॥
मग बोलले केशव स्वामी । संतदर्शनीं संतुष्ट आम्ही ॥
महायात्रा मनोधर्नीं । अर्पण करूं तुज बापा ॥१०५॥
संत दर्शनाचेनिपाडें । महायात्रेचे सुरवाडें ॥
नाहीं रस निवाडें । विद्वज्जनीं निवडला ॥१०६॥
आनंदमूर्तींची आपुली मिळणी । होतां आनंद उभय मनीं ॥
तदंश देई मज लागोनी । यात्रासुकृत नलगे मज ॥१०७॥
ऐसें बोलला ब्राम्हाण । केशवस्वामी हास्य - वदन ॥
आनंदमूर्तींकडे पाहून । बोलले झाले स्मितयुक्त ॥१०८॥
ब्राम्हाणा तुझिये बुद्धीचें । मागणें नोहे हें साचें ॥
त्वां आश्रयिलें महंताचें । पदरज त्याचें माहात्म्य हें ॥१०९॥
हांसोनी गृहस्थ स्वामीला । साष्टांग नमस्कार करिता झाला ॥
येरीं मौळीं कर ठेविला । प्रीति करोनी तेधवां ॥११०॥
तुझिये चित्तीं असे जैसें । श्रीगुरुकृपें घडेल तैसें ॥
ऐसें सांगोन तत्वोपदेश । श्रवणरंध्रीं पैं केला ॥१११॥
विप्र ब्रम्हौक्यता पावला । ऐसिया पदवीलागि आला ॥
दुर्लभ लाभ आतुडला । अचुंबित हस्ताग्रीं ॥११२॥
तये काळींचा श्लोक । आनंदमूर्तींनीं रचिला येक ॥
तोचि परिसावा नावेक । माणिकसुता सर्वज्ञा ॥११३॥
[संमत श्लोक :--- गुरू हा शिरीं हात ठेवील जेव्हां । करी आपणा सारिखे पूर्ण तेव्हां ॥
असा प्रत्ययो पूर्ण आम्हांसि पाहीं । गुरु सारिखा थोर कोणीच नाहीं पूतेव्हां ॥१॥]
श्रोते तुम्हीं अमृतकर । गोपाळात्मज कवि चकोर ॥
अवधान देइजे सत्वर । नवमोध्याय गोड हा ॥११४॥
॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु.॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.