श्रीगणेशायनम: । श्रीगुरुचरणारविंदाभ्यांनम: । श्रीरघुनाथस्वामिभ्योनम: । श्रीआनंदमूर्तयेनम: ।
रघुनाथगुरुं शांत नित्यं सद्विग्रहा श्रयं । ब्रम्हौक्यदं स्वशिष्याय तं नमामि महामुनिं ॥१॥
कृष्णातटनिवासाय लसच्छ्रीपदशालिने । व्यक्ताव्यक्तस्वरूपाय नम आनंदमूर्तये ॥२॥
ॐ नमोजी अव्यया । रघुनाथा श्रीगुरूवर्या ॥
वंदूनि तवांघ्रिद्वया । आनंद - चरितामृता आरंभितों ॥१॥
तूंचि निर्विन्घकर्ता गणपती । तव बुद्धि तेचि सरस्वती ॥
कुलदेवताधिदेव - पंक्ती । तवावययीं मी मानी ॥२॥
यास्तव अन्य प्रकार । नेणें मी बालिश किशोर ॥
आतां तव करुणा - प्रभाकर । प्रकाशित करी मजवरी ॥३॥
आतां युगांतरींचे कविश्रेष्ठ । व्यास वाल्मीक वसिष्ठ ॥
श्रीशुकादि वक्ते स्पष्ट । तयां प्रणिपात साष्टांगें ॥४॥
सांप्रत कलिमाजि बहुत । ज्ञानदेव - तुकयादि संत ॥
अथवा पुढें होणार महंत । नमन साष्टांग तयांतें ॥५॥
देशिक राजा गंगाराम । बापानंदात्मज कृपाधाम ॥
तदंघ्रि स्मरताम पूर्ण काम । सर्वांचेही हों शकती ॥६॥
ऐका श्रोते सकळ सज्जन । विमल भावें कथितों निरूपण ॥
अवधान देऊनि तयाचें पोषण । सांग करणें सर्वथा ॥७॥
अवधान वक्तृत्वाचें पोषण । जेंवि का सदन्नाचें संतर्पण ॥
तें वृथा घृतावीण । तेंवि अवधान वक्तृत्वाचें ॥८॥
आताम असो हा पाल्हाळ । आनंदचरितामृत ग्रंथ रसाळ ॥
तो कथावा निर्मळ । धिंवसा उपजला दिननिशीं ॥९॥
तो सद्गुरुरायें दीननाथें । सिद्धी नेइजे कृपावंतें ॥
जेणें संतोषोनि साधुसंत । होय म्हणती तैसें कीजे ॥१०॥
मिरजप्रांतीं ढालगांवींचे मिरासी । मूळ विद्वद्वरेण्य बाळंभट जोशी ॥
पुत्रद्वय झालें तयासी । ख्याती जयाची ब्रम्हांडीं ॥११॥
ज्येष्ठाचें नांव आनंद । कनिष्ठ ब्रम्हादेव प्रसिद्ध ॥
ब्रम्हादेवाचा विशद । अण्णंभट सुपुत्र झाला ॥१२॥
अण्णंभटा पासाव महाप्राज्ञ । दिनकराख्य त्रिकाळज्ञ ॥
दिनकरापासाव महासुज्ञ । बापानंद जाहले ॥१३॥
वेदवेत्ते सदाचारी । सत्यवादी परोपकारी ॥
कामादिक षड्वैरी । निर्जित करोनि ठेविले ॥१४॥
बंधुविभाग ग्रामजोशी । बापानंद तिसिंगीसी ॥
येते झाले सुखैकराशी । वर्ष एक क्रमियेलें ॥१५॥
सहज एकेवेळे जाण । गजरवाडी लागून ॥
येवोनि पांडुरंग दर्शन । घेते झाले आवडी ॥१६॥
पंचपदी अभंग - पंचका । नूतन करोनि गातां देखा ॥
नरसिंहभट श्रीपूजका । ऐकतां सर्व जाणवलें ॥१७॥
वेगें पातले दर्शना । उभय मिळणी होय जाणा ॥
परम आल्हाद अंत:करणा । प्रेमें मिठी न सुटेची ॥१८॥
आगत - स्वागत झालियानंतर । नरसिंह बोले जोडोनि कर ॥
श्री आनंदमूर्ति चरित्र । सविस्तर मज सांगावें ॥१९॥
समजोनि हे श्रवणभक्ति । कृपेनें द्रवली कृपामूर्ति ॥
म्हणे सावधान श्रोत्याप्रति । सादर चरित्र परिसिजे ॥२०॥
श्रीमत् परमहंस परिब्राजकाचार्य । श्रीजगद्गुरु शंकराचार्य ॥
परंपरेंत कुरुक्षेत्रीं आर्य । श्री वासुदेवानंद सरस्वती ॥२१॥
आचार्य - प्रतिमा प्रज्ञावंत । सकळ - विद्या - पारंगत ॥
ब्रम्हौक्यता पावोनि स्वस्थ । असते झाले संतोषें ॥२२॥
श्री वैकुंठानंद - सरस्वती । यांहीं बहु प्रार्थूनि विज्ञप्ति ॥
करोनि निरंतर जोडिल्या हस्तीं । सेवेलागी सादर ॥२३॥
प्रसादोन्मुख व्हावें या हेतु । सतत सेवेलागी तिष्ठतु ॥
श्रीगुरु प्रसन्न हौनी कृपावंतु । मौलीं करकंज ठेविला ॥२४॥
गुरुकृपेचें अगम्य महिमान । तात्काळ केलें ब्रम्हौक्यसंपन्न ॥
सांप्रदायिक तच्छिष्य प्रज्ञ । कृष्णानंदसरस्वती ॥२५॥
तच्छात्र श्रीरंगनाथ । गौतमीतटीं जग - विख्यात ॥
नाशिकासंनिध वाघरें येथ । वास्तव्य केलें स्विच्छें ॥२६॥
त्यांचे पुत्र काशिराज समर्थ । पित्याचा अनुग्रह घेत ॥
ब्रम्हौक्यता पावोनि स्वस्थ । चिदानंदीं समरसले ॥२७॥
पुढें योगाभ्यास आत्मसंयम । योगारूढ नैष्कर्म्य ॥
सांग संपादितां सर्वोत्तम । काशीराज नामाभिध जाहले ॥२८॥
ततसंप्रदायाची मांदी । कित्येक सतशिष्य निरुपाधी ॥
त्या राष्ट्रामाजि सुधी । असते झाले पुण्यश्लोक ॥२९॥
तयांमाजि शिष्यवतंस । रघुनाथाख्य श्रीरामांश ॥
साकेतवासी जडजीवांस । तारावया प्रगटले ॥३०॥
योगियांमाजी मुकुटमणी । समाधि - साधन - ब्रम्हाज्ञानी ॥
नैराश्यता - निरभिमानी । कपिलमहामुनी सारिखा ॥३१॥
ऐसे समर्थ योगिराज । जडजीवोद्धारणाचें काज ॥
मनीं संकल्प सहजासहज । वर्तते झाले निज इच्छें ॥३२॥
देहाभिमानी सर्वही प्राणी । मी तूं हेचि बुझावणी ॥
परमार्थ - साधनाचा मार्गं झणीं । कोणातेंही नुमगेची ॥३३॥
ऐसे अज्ञानांध जन । सुमार्गीं लावावया जाण ॥
अवतीर्ण झाले रघुनंदन । स्वामी दयाळू गुरुराज ॥३४॥
[संमतश्लोक श्रीमद्भगवद्नीता :--- सक्ता: कर्मण्यविद्वांसो यथा ॥
कुर्वन्ति भारत । कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तश्रिकीर्षुर्लोकसंग्रहम् ॥१॥]
॥टीका ॥ विद्वांस यथा संज्ञिक । कर्मासक्ति दाविती देख ॥
हे लोकसंग्रहास्तव सम्यक । तदनुरूपें वर्तती ॥३५॥
परि तयामाजी तो नाहीं । नीलनीपत्र जेवि डोहीं ॥
बुडवोनि झाडिताम सहसाही । न लिंपे जैसें जळातें ॥३६॥
ऐसे महाराज महानुभाव । आंगीं गुरुकृपेचें वैभव ॥
तीर्थाटण करावें हा भाव । आणिते झाले मनांत ॥३७॥
यमनियमांची ताटी । लावोनि बुजाविली मन - दारोटी ॥
नासिकाग्रीं न्यस्तदृष्टी । मौन - ब्रतस्थ सर्वदा ॥३८॥
प्रत्यहीं निराहार जाण । रानीं तरुतळीं वास करणें ॥
ग्रामामाजि नाहीं जाणें । निरंजनीं वास सदैव ॥३९॥
द्वादश वार आपुले स्कंधीं । वाहोनि नि:शंक मनबुद्धि ।
स्वर्धुनी - कावडी सेतुबंधीं । रामेश्वरा अभिषेकु ॥४०॥
हा संकल्प देह वाङ मनीं । दृढतर ठेविला मनीं ॥
सेतुबंधस्थ वालुका नेऊनि । गंगोत्रीमाजि समर्पावी ॥४१॥
ऐशा कावडी एकादश । अभिषेकिल्या रामेश्वरास ॥
तेथोनि वालुका गंगोत्रीस । एकादशवार निक्षेपिली ॥४२॥
मग बारावे यात्रेलागी । जात असतां महायोगी ॥
पूर्ण कुंभ कावड अंगीं । व्याघ्राजिन वेष्टिलें ॥४३॥
मिरज देश ढालगांव प्रांतीं । निमजग्राम उद्वस वस्ती ॥
निबिडामाजी श्वापदें राहती । व्याघ्रवृकादि अनेक ॥४४॥
बेलगंगा अघहारिणी । प्रांजल सलिल पूर्व - वाहिनी ॥
तिचे उत्तर तटाकीं योर्गामुनी । स्नानसंध्येसी उतरले ॥४५॥
स्नान संध्यादि अनुष्ठान । सारोनि पुढें करावें गमन ॥
या हेतु रघुनंदन । कावड भूमिये ठेविली ॥४६॥
कावडीवरती व्याघ्रांबर । टाकिते झाले करोनि प्रसार ॥
स्नान संध्या सारोनि सत्वर । आले व्याघ्राजिनछायेसी ॥४७॥
वज्रासनीं दृढतर मिठी । नासिकाग्रीं ठेउनी दृष्टी ॥
अत्युच्चग्रीवा सह हनुवटी । योगधारणा आंरभिली ॥४८॥
समाधिसुखांत निमग्न । बाहय वार्ता कांहीं नेणे ॥
तशा समयीं कोणी दुरून । कावडी पाहिली भपानक ॥४९॥
व्याघ्रा ऐसें व्याघ्रांबर । देखोनि तया न पोचे धीर ॥
ढालगांवा जावोनि सत्वर । व्याघ्रवार्ता कथियेली ॥५०॥
ग्रामवासी धावले हेर । त्यांनीं न्याहाळिलें व्याघ्रांबर ॥
म्हणती सत्य पातला व्याघ्र । बहुता जणीं पाहिला ॥५१॥
नगरप्रभु अप्पाजीपंत । देशलेखक बुद्धिवंत ॥
सर्वविषयीं संपन्न बहुत । वीरश्री - मद चढला तया ॥५२॥
कवच - खडग उलाटयंत्र । तोडा पेटवून अति सत्वर ॥
सवें घेऊनि कित्येक वीर । तया स्थळा पातला ॥५३॥
दुरूनि पाहतां आभास । व्याघ्राचाचि सर्वत्रांस ॥
न्याहाळून मग तयास । अप्पाजीपंतें पाहिलें ॥५४॥
व्याघ्राजिन ओळखिलें स्पष्ट । छायेस योगिराज श्रेष्ठ ॥
ध्यानस्थ बैसले योगनिष्ठ । चेष्टेरहित निश्चळ ॥५५॥
धावोनी पोचले तया निकट । वंदिलें जोडोनि पाणिपुट ॥
न करितां शब्द - बोभाट । बहुतापरी विनविलें ॥५६॥
टाळी लागली ब्रम्हानंदीं । कांहीं नेणे बाहय उपाधी ॥
अप्पाजीपंत महासुधी । सर्व चिन्हें ओळखिलीं ॥५७॥
साष्टांग प्रणिपात त्या समयीं । केले अप्पाजीपंतें पाही ॥
समाधि विसर्जुनि लवलाहीं । स्मरणीं आले रघुनाथ ॥५८॥
भ्रूसंकेतें पुसलें त्यातें । नमस्कार घालितां किंनिमित्त ॥
कोण कोठील काय हेत । इच्छितार्थ बोलावा ॥५९॥
येरू बोले करोनि नमन । मी जड आळशी हीन दीन ॥
स्वामी करुणाघन निधान । सनाथ केलें पाहिजे ॥६०॥
चलावें माझिया आश्रमा । शिरीं ठेवावें हस्तपद्मा ॥
ममेच्छा काम - कल्पद्रुमा । पूर्ण केली पाहिजे ॥६१॥
मग भ्रुसंकेत दाऊन । भूमीस अक्षरें लिहिलीं जाण ॥
तीर्थ - यात्रादि वर्तमान । सर्वही लिहून दाविलें ॥६२॥
एकादशवार कावडी । अर्पिल्या रामेश्वरा आवडी ॥
बारावी खेप येवढी । अभिषेचना नेणें असे ॥६३॥
व्रतस्थ नेम अति कठिण । प्रत्यहीं निराहार उपोषण ॥
ग्रामवस्तीस नाहीं जाणें । निरंजनीं वास सदा ॥६४॥
पंतें विनविलें योगिराया । यात्रा समाप्त झालिया ॥
पुनरागमनें स्वामिया । भेटी - निक्षेप मज देणें ॥६५॥
एतद्विषयीं द्दढवचनार्थ । देवोनि कीजे स्वस्थ चित्त ॥
मुनीनें उचलोनी कृपा हस्त । हस्तीं भाष दीधली ॥६६॥
शके पंधराशें सदसष्टिसीं । पार्थिव संवत्सर माघमासीं ॥
पूर्ण चंद्र पौर्णिमे दिवशीं । प्रात: काळीं प्रथम यामीं ॥६७॥
रूप धरोनिया आन । वर्षत्रयाचें बाळ सान ॥
ऐशा रूपें तुज दशर्न । होईल ही खूण ओळख तूं ॥६८॥
ऐसें द्दढ वचन देऊन । पुढें तेथून केलें गमन ॥
पंतानें संकेत लिहून । पत्रावरी ठेविला ॥६९॥
तें पत्र लिहून माजघरीं । साक्षेपें डकविलें गृहद्वारीं ॥
निजध्यास दिन - रात्नीं । दर्शन दिवस गणीतसे ॥७०॥
प्राप्त झाला संकेत दिवस । पूर्वार्जित आलें फळास ॥
स्वामी दयाळू आज घरास । येउनी धन्य मज करितील ॥७१॥
माघ पौर्णिमा प्रात: काळीं । सडासम्मार्जन रंगावळी ॥
करोनि स्वानंदें ह्रतकमळीं । प्रतीक्षा करितसे मार्गाची ॥७२॥
धौतांबर अंग शुद्धवस्त्र । परिधान वास घेऊनि सुरुचिर ॥
देवगृहामाजी द्दढतर । आसन घालून बैसले ॥७३॥
एकाएकीं मनोहर । बाळरूपी रघुवीर ॥
अंगीं हेम अलंकार । गौरवर्ण साजिरा ॥७४॥
आंगीं टोपी वाघनख । कटि - भूषणें कंठीं पदक ॥
वर्षत्रयांचें बाळ सुरेख । सांगणीं पातलें निज भाग्यें ॥७५॥
अनोळखी कोठील बाळ । कोणाचा हें कोणा न कळे ॥
पंतें ओळखून श्रीगुरू दयाळ । लोटांगण घातलें ॥७६॥
धणी न पुरे मुख पाहतां । परम आल्हाद जाहला चित्ता ॥
जैसा दरिद्रिया अवचिता । द्रव्य - कूप लाधला ॥७७॥
स्वामियें रूप पालटून । पूर्व रूपें दिधलें दर्शन ॥
पंतें विस्मय करून । लोटांगण घातलें ॥७८॥
परमानंद अंतरीं । हर्षें निर्मर धरोनी करी ॥
घेऊनि गेले देवघरीं । उत्तमासनीं बैसविलें ॥७९॥
पाद्य अर्व्य सविधि पूजा । करोनि नमिलें पदांबुजा ॥
ध्यान निरखितांच वोजा । वृत्तिरहित जाहला ॥८०॥
[संमत श्लोक आनंदबोधांतील :--- तों द्वारदेशीं नयनीं अपा हे । श्रीसच्चिदानंद धरेश पाहे ।
ज्याची तनू तप्त सुवर्णवर्णी । वाची करीं पोथि सुवर्णवर्णी ॥१॥
नात्युच्च ना नीच अकार ज्याचा । सुहास वास प्रपदीं रजाचा ।
सुभ्रू सुनासांबुज नेत्र तेजीं । तें ध्यान मुद्रेंत अपार तें जी ॥२॥]
प्रपंच व्यवहार सर्व शून्य । होवोनि गेले निरखितां ध्यान ॥
सहजीं मुद्रा समाधि गहन । अभ्यंतर व्यापिलें ॥८१॥
किंबहुना मुद्रा खेचरी । लागतां देहभान भर उभरी ॥
कोण जाणे परि हे परी । जाणे श्रीगुरु दयाळ ॥८२॥
ज्ञानोपदेशा योग्य सत्य । पात्र सुधी अप्पाजीपंत ।
ऐसें जाणोनी मनांत । वृत्तीवरी आणिले ॥८३॥
पंतासी बोलिले कृपा - मूर्ती । आमंत्रणींच वरिली तृप्ती ॥
अलभ्य भोजन झालिया अंतीं । काय कैसें मग करणें ॥८४॥
अवस्था जिरवूनी सुजाणा । सावध करी अंत:करणा ॥
ऐसें वदतां श्रीगुरुराणा । पंत झाले सावध ॥८५॥
पंतें सुचविलें गृहपरिवारा । पाकसिद्धि त्वरित करा ॥
आज्ञा वचनें करोनी त्वरा । सिद्ध जाहला नैवेद्य ॥८६॥
अति सुगंध स्नेह उटणें । लावोनि करविलें मंगल स्नान ॥
नूतन वस्त्र परिधान । अलंकारादि लेवविलें ॥८७॥
गंधाक्षता पुष्पहार । अन्न - सामुग्री - संभार ॥
यथोक्त पूजोन सुबद्धकर । उभा ठेला जवळिकें ॥८८॥
कृपें द्रवली गुरुमाउली । जेवि वत्सातें गाउली ॥
कीं त्रितापश्रांतातें साउली । कल्पतरूची जेवि कां ॥८९॥
जवळी बैसऊनि पंत । मौळीं ठेविला वरदहस्त ॥
उपासना मंत्र - दीक्षा समस्त । उपदेशिलें गुरुवर्यें ॥९०॥
नैवेद्य जाहलिया सुरवाडें । त्रयोदशगुणीं अर्पिले विडे ॥
कृतार्थ मानुनी गुरुपुढें । विनंति करी आवडी ॥९१॥
पुढें कथा रसाळ बहुत । श्रोते होऊनि सुचित ॥
अवधान द्यावें विनवित । गोपाळात्मज संतातें ॥९२॥
आनंद - चरित्रामृत ग्रंथ । बापानंद - विरचित ।
स्नेहें परिसोत श्रोते संत । प्रथमोध्याय गोड हा ॥९३॥
श्रीरघुनाथस्वामी प्रसन्न । होऊनि करिती शिष्य - समाधान ।
त्याचे मनोरथ करूनि पूर्ण । प्रथमाध्याय संपविला ॥९४॥
॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.