नरसिंह म्हणे दिनकरात्मजा । रसाळ कथा निरोपी वोजा ॥
आनंदमूर्ति श्रीगुरुराजा । मिळणी कैसी जाहली ॥१॥
वक्ता म्हणे ऐके स्वस्थ । गुरुशिष्य - मिळणी साद्यंत ।
पाप ताप दैन्य त्वरित । चरितामृत दूर करी ॥२॥
श्रीमद्गुरूराज रघुनाथ । अप्पाजीपंत - गृहीं राहत ॥
सौध माळिकेच्या वरते । एकांत स्थळ निगूढ जें कां ॥३॥
स्नान संध्यादि नित्य नेम । सारोनि श्रीगुरु - शिष्योत्तम ॥
संवाद - रहस्य निरुपम । खोलीमाजी होतसे ॥४॥
तत्वोपदेश झालियावरी । आत्मस्थिती कळाकुसरी ॥
निरूपणाची भरोभरी । अनिर्वाच्य बोलती ॥५॥
प्रत्यहीं एकांतामाजि जाण । योगवाशिष्टसार - विवेचन ॥
पंचरत्न - गीता सह व्याख्यान । निरूपण चालविलें ॥६॥
अप्पाही एकाग्र श्रवण करित । ऐसे लोटले दिवस सात ॥
पुढें चमत्कार विपरीत । कांहीं एक वर्तला ॥७॥
ग्राम - ज्योतिषी विख्यात । बाळंभटाचा ज्येष्ठ सुत ॥
अनंतभट विद्वांसांत । अग्रगण्य सर्वां मान्य ॥८॥
वय वर्षें सत्राआंत । दश ग्रंथ मुखोद्नत ॥
विद्यामदें आग्रहे कोणातें । गणणें नाहीं सर्वथा ॥९॥
शास्त्रार्थ - निर्णयीं परम कुशल । सर्व सिद्धांत ग्रह - समेळ ॥
याज्ञिक विषय करतळामळ । दुजा नाहीं या खंडीं ॥१०॥
पूर्व वयाचा अंगीं ताठ । गुणाद्य सर्वां वरिष्ठ ॥
तर्क - ज्ञानामाजि श्रेष्ठ । मान पावे बहुतां ठायीं ॥११॥
पंत - गृहींचे ते पुरोहित । ग्रामांतरा गेले होते ॥
मागें जाहला वृत्तांत । गुहा येतां जाणवला ॥१२॥
रात्रीं निद्रागृहीं जाण । स्त्रींनें कथिलें वर्तमान ॥
पंतें कोणी साधू आणून । अनुग्रह घेतला ॥१३॥
प्रतिदिवस माडी वरुतें । उभयतां बैसून एकांत ॥
पुस्तक घेऊन वेदांत । विवरण करिती निशिदिनीं ॥१४॥
ऐसें पंताधरचें वृत्त । पंताचे स्त्रीनें साद्यंत ॥
मजला कथिलें यथार्थ । सहज वृत्ति कथिलें तुम्हां ॥१५॥
ऐसें स्त्रीनें वदतां स्पष्ट । भटजी झाले क्रोधाविष्ट ॥
म्हणे आमचा शिष्या परि उद्धट । आप्पाजीपंत गुरुद्रोही ॥१६॥
दंडकाष्ठ हातीं घेऊन । वेगें पातले पंत - सदन ॥
महाद्वारीं येऊन । द्वारदेशीं ठाकले ॥१७॥
हाका मारितां क्रोधयुक्ता । परिवारीं येवोनि त्वरित ॥
भटजी घेतां वाडिया आंत । शब्द पंतें ऐकिला ॥१८॥
लोटली असतां अर्धनिशी । ब्राम्हाण पातले क्रोधराशी ॥
पंत सांशक मानसीं । अनर्थ दिसे पुढारा ॥१९॥
पंत - प्रकृति विलोकून । श्रीगुरु पंतास बोलिले वचन ॥
अव्यग्र करोनिया मन । निरूपण श्रवण करणें ॥२०॥
इतुक्यांत भटजी अनंत । त्वरें वेघले माडी वरते ॥
तों उभयता खोलींत । भाषण करितां ऐकिले ॥२१॥
काय बोलती हें निश्चळ । ऐकावया उतावेळ ॥
अंतरीं क्रोध - वडवानळ । ह्रदयोदधींत धडकला ॥२२॥
आधीं करूं शब्दपरीक्षा । मग बोलूं अविचारदक्षा ॥
सहजचि मम करें शिक्षा । उभयतांही पावती ॥२३॥
ऐसा भाव आणोनी चित्तीं । सोपानद्वारीं तिष्ठती ॥
तंव दयानिधी श्रीगुरुमूर्ती । पंताप्रति सांगती ॥२४॥
ब्राम्हाणकुळीं जाहला जन्म । सर्व वर्णांत उत्तमोत्तम ॥
ऐसे जन्मीं जो विप्राधम । आत्मस्थिति नोळखे ॥२५॥
देहाभिमान मद्यपान । विद्यागर्वी पिचाशपण ॥
मोह - किरडें रोविले दशन । शुद्धि नुरली जयाला ॥२६॥
यातिश्रेष्ट जरी तो नर । परि तो रजका घरचा खर ॥
निर्धारितां हा विचार । आन येथें दिसेना ॥२७॥
[संमत आर्या आनंदबोधांतील :--- येऊनि विप्रकुळातें जो सच्चिदघन न शोधितो कांहीं ।
द्विजवर खर तो ऐसें ऋग्वेदादि श्रुती वदे पाही ॥१॥
चारी वेद पढोनी शास्त्राभ्यासी विशेष तो झाला ।
आत्मज्ञान - रहित जो द्विजवर खर तो म्हणे श्रुती त्याला ॥२॥
नृपसुत हौनियाही नृपपद - रोहण जया घडेनाचि ।
व्यर्थचि नृप म्हणतांही आज्ञा कोणी न वंदिती त्याची ॥३॥]
ऐसे श्रीगुरू वाक्य वदले । येरें साद्यंत श्रवण केलें ।
कपाटसंधींतून निरखिलें । स्वरूप आपाद - शीर्षवरी ॥२८॥
तात्काळ देहभाव परतले । अज्ञान देशोधडी गेलें ॥
उपरतींनें ग्रस्त केलें । मौढय परिवार सहित ॥२९॥
दर्शनासरिसा हेत उदेला । कैं विनटेन श्रीगुरुपाउला ॥
पश्चात्तापें ग्रास केला । विद्यागर्वादि सर्वांचा ॥३०॥
सत्समागम मोटका । ऐसा लाभ मुमुक्षु लोका ॥
नाहीं नाहीं ऐसी देखा । सरस्वती आण वाहे ॥३१॥
कपाट उघडोनि ततक्षणीं । मस्तक ठेविर्ले श्रीगुरुचरणीं ॥
त्राहे त्राहे म्हणोनी । बाष्प कंठीं दाटला ॥३२॥
नेत्रीं चालिल्या विमळांबुधारा । रोमांच थरकलें शरीरा ॥
अष्टांगीं कंप थरारा । काष्ठवत् पडला श्रीचरणीं ॥३३॥
श्रींनीं विचार केला मनीं । हे असती परम अभिमानी ॥
याचे आज्ञेंत राहुनी । सुमार्गास मग लावूं ॥३४॥
मग सुहास्य बोलूं आदरिलें । तुम्हीं सर्वश्रेष्ठ वहिले ॥
तुमचीं वंदावीं पाउलें । आम्हां ऐसेनी सर्वदा ॥३५॥
ऐसें बोलतां प्रज्ञावंत । मनीं खोचला अनंत ॥
म्हणे माझें अंतरगत । श्रींस सर्व जाणवलें ॥३६॥
शिक्षार्थ बोलती उपरोध । म्हणे स्वामी मी मदांध ॥
अपराधी असे, अप्रबुद्ध । दुजा नसे ब्रम्हांडीं ॥३७॥
आतां द्याल जरी अभयवचन । तरीच पायींच उठेन ॥
श्रीगुरु माय करुणाघन । शिरीं हस्त ठेविजे ॥३८॥
मी दुर्बुद्ध संसृतिमुक्त । करोनि उद्धार करावा त्वरित ॥
द्दढता जाणोनि अभयोक्त । वचन देती गुरुराव ॥३९॥
श्रीगुरुध्यान अवलोकून । निरूपण श्रीमुखें ऐकून ॥
वृत्ति जाहली तल्लीन । गृहा जाणें विसरले ॥४०॥
निश्चयें पंताच्या गृहीं । राहोनि तत्पर सेवे विषयीं ॥
वृत्ति वेधली श्रीगुरूपायीं । ह सर्व श्रींतें जाणवलें ॥४१॥
बेलगंगेचिया स्नाना । निमजसंनिध श्रीगुरुराणा ॥
जावोनि निळंबी छायेस जाणा । स्नान - संध्यादि सारिलें ॥४२॥
त्या काळीं आप्पाजीपंतें । विनविलें स्वामी श्रीगुरूतें ॥
अनंताचा मनोरथ । पूर्ण कीजे दयाळा ॥४३॥
त्यासी दिधलें अभय वच । तें स्वामींनीं कीजे साच ॥
हें मुमुक्षुत्व आहे तयाचें । अंतरंग गुंतलें श्रीचरणीं ॥४४॥
आज योग आमृतसिद्धि । गुरुवार पुष्यर्क संधी ॥
या लागी निरवधी । उद्धार याचा कीजे जी ॥४५॥
मग प्रसादोन्मुखता पाहून । अनंतभटा करवीं जाण ॥
अर्घ्य - पाद्य विधि पूजन । करविलें यथासांग ॥४६॥
उपासनापूर्वक महामंत्र । कर्णरंध्रीं गुरु सांगत ॥
महावाक्य - विवरणें अनंत । ब्रंम्हानंदीं समरसले ॥४७॥
ह्रदयीं उमटतां ज्ञान । जाहलें चित्ताचें चैतन्य ॥
अवस्थात्रय मागें सारून । उन्मनीमाजि पुहुडले ॥४८॥
तीन अहोरात्री जैसा । बैसला होता बैसलाच तैसा ॥
श्रीगुरु दयाळू कोवसा । ऊद्बोधी तैं सुधा वचनें ॥४९॥
निजानंद पदीं निरंतर । तुम्हीं जाहला निदसूर ॥
पुढें जडजीवांचा उद्धार । तुमचे हातें करविणें आहे ॥५०॥
समाधिसुखापासूनि पहिलें । तुम्ही झडझडून निघा वहिले ॥
मग पंचदश्यादि उपदेशिलें । त्वंपद - तत्पद - विवरण ॥५१॥
उपदेसक्रम उथानिगुती । जरी व्हावी स्वयंप्रतीति ॥
गुरुकृपा सरती पुरती । संपादिली पाहिजे ॥५२॥
त्यावीण शुष्क बोल विफळ । गुरुवीण सबाहय अमंगळ ॥
पय अधणीं रांधिले हरळ । केवि पाकास येती ते ॥५३॥
सगुण निर्गुण उपासनेचे । प्रकार सांगोनी प्रत्ययाचे ॥
फल सर्वही साधनाचें । सोपें करोनी दीधलें ॥५४॥
श्रीगुरु सांगती अनंत - कर्णीं । सांगती साधकास झडपणी ॥
अहंभावना निपरीत ये क्षणीं । झडपती ज्ञान - गर्वें ॥५५॥
याचे मस्तकीं लोह - खिळा । श्रवण - मनन - निजध्यास - मेळ ।
ठोकोनि अमानित्वें सकळा । आपण व्हावें चिदरूप ॥५६॥
ऐसें सांगोनि करुणाकर । भेदबुद्धि दवडावयाचा विचार ॥
मनीं आणून चमत्कार । कांहीं एक दाखविला ॥५७॥
विश्व तें मी विश्वाआंत । ऐसी द्दढता सहजीं मनांत ॥
असतां सगुण स्वरूप आसनावरतें । एकाएकीं दिसों आले ॥५८॥
श्रीरामचंद्र मंगळधाम । सावळें रूप घनश्याम ॥
वामांकीं सीता गुणग्राम । प्रत्यक्ष द्दष्टी देखिलें ॥५९॥
सद्नद अनंत झाला ह्रदयीं । भेदबुद्धि विरली ठायीं ॥
श्रीराम तेच सदगुरु पाही । ऐसें आलें प्रत्यया ॥६०॥
श्रीगुरु म्हणती शिष्य - निधाना । पुढें अनेक चरित्न - रचना ॥
तव हातें करविणें प्राज्ञा । निश्चळ धीमंत होय तूं ॥६१॥
सकळ लोक साधारण । सवें वर्तणूक तुवां करणें ॥
ऐसें वदतां गुणनिधान । विश्वास चित्तीं बाणला ॥६२॥
मग साष्टांग करोनी प्रणिपात । आज्ञा प्रमाण म्हणुनी स्वस्थ ॥
राहिले पंत - गृहीं अनंत । सेबे सादर सर्वदा ॥६३॥
अनंत भटाचे जनिते । बाळजोशी स्वगृहीं होते ॥
तया अन्यमुखीं वृत्तांत । गुरु - मार्गाचा जाणवला ॥६४॥
पांच चार दिवसा नंतर । बाळ जोशी ओसरीवर ॥
बैसले असतां सत्वर । अनंत आला निजसदनीं ॥६५॥
वडिल बोलिले क्रोधोत्तरीं । तुम्ही न यावें गृहाभीतरीं ॥
वैदिक कुळामाझारीं । कर्मभ्रष्ट जाहलां ॥६६॥
आमच्या वैदिक कुळांत । कोणी नाहीं गुरू करीत ॥
तुम्ही आणि अप्पाजीपंत । दुराचरण आचरलां ॥६७॥
तुम्हांस जरी या गृहीं येणें । तरी आम्ही गृह त्यागून ॥
आतांच जाऊं स्पष्ट जाण । वाक्य अन्यथा नोहेची ॥६८॥
घेऊन आपुले स्त्रीस । सवें चलावें देशांतरास ॥
मुखावलोकन करावयास । पुन्हा इकडे न यावें ॥६९॥
मग अनंतें उदास होऊन । वस्त्रालंकार सर्व काढून ॥
गृहांत दिघले झोकून । साष्टांग नमिलें पितयासी ॥७०॥
मागे फिरले त्याच समयीं । गृहांत गृहिणी सकूबाई ॥
महासाध्वी पतिव्रता पाही । दो मासांची बाळंतीण ॥७१॥
तिजलागीं वडिलें आज्ञापिलें । तुमचे भ्रतार जिकडे गेले ॥
त्या मागें तुम्हीं वहिलें । आताम्च गंतव्य करावें ॥७२॥
येरी निघाली तेचि क्षणां । सवें घेतला बाळ तान्हा ॥
आप्पाजीपंतागृहीं जाणा । स्वामी निकट पातली ॥७३॥
तीतें देखतां श्रीदयाळ । पंतासी पुसलें स्नेह - मेळें ॥
अनंतामागें सहितबाळ । उभी बायको कोण ते ॥७४॥
पंतें श्रीगुरूस कथिलें । वडिलीं अनंतास बाहेर घातलें ॥
गृहिणीसहवर्तमान आले । चरण आश्रयिले स्वामींचे ॥७५॥
ऐसें ऐकतांच वचन । स्वामी बोलिले करुणाघन ॥
यांचा भार आम्हां लागून । वाहणें प्राप्त ये काळीं ॥७६॥
आतां न राहूं येथें । गंतव्य करणें प्राप्त त्वरित ॥
म्हणोनि उठले श्रीरघुनाथ । प्रयाण केलें बाहेरीं ॥७७॥
पुस्तकादि संध्योपकरणीं । अनंतें स्कंधें वाहोनी ॥
स्वामी मागें तेच क्षणीं । स्त्रियेसहित चालिले ॥७८॥
आप्पाजीपंतास कांहीं एक । गोष्ट सुचवोनि ठेविली देख ॥
अनंतास या ग्रामीं लोक । मनुष्य भाविती अज्ञ ते ॥७९॥
परी मनुष्य नोहे निर्धारीं । योगभ्रष्ट जन्मांतरीं ॥
तप आचरोनिया अवतारी । बैदिक कुळीं उपजला ॥८०॥
हे बाहेर पडतां पाही । कृशान पेटेल गृहोगृहीं ॥
सावध असावें ये समर्थी । ग्राम दग्ध होतसे ॥८१॥
ऐसें सुचवोनि श्रीरघुवीर । गंतव्य केलें ग्रामाबाहेर ॥
मागें चेतला वैश्वानर । प्रळय थोर वर्तला ॥८१॥
रघुनाथ - अनंत राम - सौमित्र । क्षोभें ढालग्राम लंकानगर ॥
विषाद - मारुतीनें समग्र । क्षणामाजी जाळिलें ॥८३॥
आप्पाजीपंताचें गृह । बिभीषण - गृहवत् रक्षिलें पाहे ॥
स्वामि - कोपाग्नीपुढें राहे । ऐसा कोण त्रिभुवनीं ॥८४॥
रघुनाथ शिष्यासहित जाण । पीश्चम दिशेस केलें गमन ॥
दुसरे दिवशीं येऊन । वेदातीर आटोपिलें ॥८५॥
वसगडें ग्राम पुण्यस्थळ । ग्रामा निकट वेशीजवळ ॥
महालक्ष्मीचें देऊळ । तेथें येऊन उतरले ॥८६॥
ग्रामवासी जन समग्र । त्यांस कळला समाचार ॥
येवानि म्हणती नगराबाहेर । राहणें योग्य स्थळ नोहे ॥८७॥
त्यांसी बोलिले श्रीरघुवीर । करितों पृथ्वींत संचार ॥
आमचें कोण काय नेणार । निस्पृह निरंजनीं वास सदा ॥८८॥
वास्तव्य करणेस कृष्णातीर । स्वेच्छ नाहीं दुसरें नगर ॥
येथेंच राहावें हा विचार । बरवा चित्ता गमतसे ॥८९॥
कृष्णा - वेदा - संगम । स्नानसंध्येस स्थळ उत्तम ॥
जाणोनिया श्रीराम । अनंतासहित निघाले ॥९०॥
आश्रमीं ठेवून सखूबाई । उभयतां नदीस गेले पाही ॥
नित्यनेम सारोनि लवलाहीं । आले परतोन मागुती ॥९१॥
ग्रामवासिक ब्राम्हाण । सामुग्री सिधा देती आणून ॥
आश्रमीं सकूबाईनें । पाकक्रम चालविला ॥९२॥
ग्रामवासी ब्राम्हाण बहुत । आदर करिती राहणें येथ ॥
प्रसन्न मनें नगरांत । येवोन वास्तव्य करावें ॥९३॥
श्रींनीं निरोपिलेम तयां । पृथक गृह योग्य राहावया ॥
देत असल्या कांहीं दिन या । ग्रामीं वास्तव्य करीतसों ॥९४॥
पुढतीं बोलिले विप्रसमुदाये । एक गृह स्वतंत्र आहे ॥
परी त्या गृहीं ब्रम्हाग्रहें । वास केला बहु दिन ॥९५॥
प्रशस्त वाटलें चित्तासी । तरी आतां चलावें वसतीसी ॥
अवश्य म्हणोनि सुखैकराशी । वास्तव्य तेथून उचलिलें ॥९६॥
विस्मय करिती सकळ लोक । पाहूं इच्छिती हें कौतुक ॥
जेथें सहज कोणी एक । गेलिया मृत्युवश होतसे ॥९७॥
तया स्थळींच राहूं म्हणती । सवें बाळ आणि सती ॥
कैसी काय होईल गती । चित्तीं साशंक सर्वही ॥९८॥
सवें घेऊन ब्रम्हा - मंडळी । स्वामी पातले गृहा जवळीं ॥
दुरून दाविलें गृह सकळीं । जवळी येऊं न शकती ॥९९॥
स्वामींनीं धरोनि बलात्कारें । सर्व नेले आंत सत्वर ॥
भयें व्याप्त ओसरीवर । विप्र - समुदाय थोकला ॥१००॥
स्वामी जातां माजघरीं । ब्रम्हाराक्षस तो झडकरी ॥
उठोनि श्रीतें नमस्कारी । स्तोत्र करी बहुसाल ॥१०१॥
म्हणे मी आज जाहलों कृतार्थ । बहु दिवस या दुष्ट योनींत ॥
राहून अपराध केले बहुत । ततक्षम्यतां श्रीगुरो ॥१०२॥
आतां मजला मुक्ति दीजे । दुष्ट योनींतून सोडवीजे ॥
कृपाकटाक्षें निरखितां बोजें । मोक्षपदा पावेन मी ॥१०३॥
ऐसी विनवणी करितां देख । बाहेर सर्व परिसती लोक ॥
दृष्टी पाहतां निष्टंक । गोचर कांहीं नोहेची ॥१०४॥
माजघरांत आले सकळ । चोहोंकडे न्याहाळिती निर्मळ ॥
दृष्टी न पडतां प्रांजळ । स्तुतिवाद श्रवणा येतसे ॥१०५॥
आश्चर्य वाटलें सकळ लोकां । फिटोनि गेली सर्व शंका ॥
स्वामीआज्ञेवरून देखा । संमार्जनादि करविलें ॥१०६॥
समुदाय - सह संतर्पण । व्हावें ग्रामस्थ इच्छून ॥
सर्व सामुग्री सिद्ध करोन । पाकनिष्पत्ती करविली ॥१०७॥
तया ब्रम्हाराक्षसालागीं । स्वयें बोलिले रघुनाथ योगी ॥
अंतर कळविलें कृपापांगीं । मुक्ती हेतू तुज आहे ॥१०८॥
तरी गोचर व्हावें सर्व जना । प्रगट करी आपणा ॥
उदईक जाऊं गंगास्नाना । तेथें मुक्ति तुवा घेणें ॥१०९॥
तथास्तु म्हणोनी खेचर । झाला सर्वांस गोचर ॥
ब्राम्हाणरूपें सर्वेश्वर । नमस्कारिले ब्रम्हाग्रहें ॥११०॥
सर्व जनीं देखिलें दृष्टी । आश्चर्य वातलें सर्व सृष्टी ॥
म्हणती विपरीत ऐसी गोष्टी । मागेंपुढें नायकों ॥१११॥
भोजन सारोन विप्रमेळा । संतोषें वैसले स्वामीजवळा ॥
भावें वंदिती अंघ्रिकमळा । कोणी स्तुतिवाद गर्जती ॥११२॥
दुसरे दिनीं समंधासहित । स्वामी निघाले संगमा त्वरित ॥
सकळ विप्रोत्तम ग्रामस्थ । समागमें चालती ॥११३॥
मग संगमास जातेक्षणीं । स्वामी बोलिले राक्षया लागोनी ॥
आतां विलंब न करोनी । मुक्ति घेणें या स्थळीं ॥११४॥
अवश्य म्हणोनी राक्षस देख । रूप धरिलें भयानक ॥
विक्राळ दाढा विकट - मुख । बाबरझोटी पिंगट ॥११५॥
जनास सांगे ब्रम्हाराक्षस । व्यग्र न कीजे मानस ॥
मज पासोनी तुम्हांस । भय नाहीं सर्वथा ॥११६॥
ऐसें गर्जोनी तये घडी । गंगेमाजी टाकिली उडी ॥
दुष्ट योनीची बेडी । तुटोनि गेली गुरु - इच्छें ॥११७॥
आश्चर्य करिती सर्व लोक । म्हणती कर्तृत्व सर्वाधिक ॥
प्रतिदिनीं अधिकाधिक । भक्तीस लागले जन सर्व ॥११८॥
कोणी गुरु - दीक्षा घेती । कोणी स्तुतिवाद गर्जती ॥
अहोरात्र भजनीं राहती । गुरुपरायण सर्व जन ॥११९॥
पुढें कथा बहु स्वादिष्ट । श्रवण करोत संत श्रेष्ठ ।
गोपाळ - सुताचें अभीष्ट । संतचरणीं सर्वही ॥१२०॥
आनद - चरितामृत ग्रथ । बापानंद - विरचित ।
स्नेहें परिसोत श्रोते संत । द्वितीयोध्याय गोड हा ॥१२१॥
॥ श्रीरघुनाथार्पणमस्तु ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.