सुकुमार मुखकमल । निजसार निर्मळ ॥
सांवली सुनील तनू ॥ भ्रमरांग कुरळ ।
झळकती दिव्यतेजें ॥ दंत माजी पातळ ॥
मिरवलों मयूरपत्रें ॥ मुकुट कुंडले माळ ॥ १ ॥
जय देवा जगदीश्वरा ॥ धन्य रखुमाईवरा ॥
आरती करीन काया ॥ ओंवाळीन सुंदरा ॥ धृ. ॥
गोजिरे ठाणमाण ॥ भुजा मंडीत चारी ।।
शोभती शंख चक्र ॥ गदा पद्ममोहरी ह्रदयीं ब्रह्मपद ॥
बाणलेसे शृंगारी ॥ गर्जती चरणी वाकी ॥
कंठ कोकिळस्वरी ॥ २ ॥
घवघवीत उटी अंगी ॥ पावन चंदनाची ॥
ललाटी कस्तूरीची ॥ कास पीतांबराची ॥
कटीसूत्र वरि साजिरे ॥ प्रभा वर मोतियांची ॥
संगीत सकळ मुद्रा ॥ पाऊलें कुंकुमाची ॥ ३ ॥
सौभाग्य सुखसागर ॥ गुण लावण्यखाणी लाघवी दीनवत्सल ॥
विश्व लाविलें ध्यानी ॥ आश्चर्य देव करिती ॥
ऋषि राहिले ध्यानी ॥ धन्य तें प्रसवली ॥
ऎसिया नंदपत्नी ॥ ४ ॥
वर्णिता ध्यानमहिमा ॥ श्रुति राहिल्या नेती ॥
रविकोटी चंद्र तारा ॥ प्रकाशा न तुळती ॥
उदार सुर रंग ॥ गंभीर आनंदमूर्ती ॥
तुकयाबंधु म्हणे ॥ स्तवूं मी काय कीर्ती ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.