ओंवाळूं गे माये विठ्ठल सबाह्य साजिरा, सबाह्य साजिरा ॥
राई रखुमाई सत्यभामेच्या वरा ॥ धृ. ॥
कनकाचे पर्येळी उजळोनी आरती, उजळोनी आरती ॥
रत्नदीपशोभा कैसा प्रकाशल्या ज्योती ॥ १ ॥
मंडितचतुर्भुज कानी शोभति कुंडलें, कानी शोभति कुंडलें ॥
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ॥ २ ॥
वैजयंतिमाळ गळा शोभे स्यमंत, गळां शोभा स्यमंत ॥
शंखचक्रगदापद्म आयुधें शोभते ॥ ३ ॥
सांवळा सुंदर जैसा कर्दळिचा गाभा, जैसा कर्दळिचा गाभा ॥
चरणीची नुपुरें वांक्या गर्जतो नाभा ॥ ४ ॥
ओंवाळितां मन माझें ठाकलें ठायी ॥
समाधिस्थ समान तुकय लागला पायी ॥ ओवाळूं ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.