गावों नाचों विठी करुं तुझा अनुवाद, तुझा अनुवाद ॥
जिकडे पाहें तिकडें सर्वमय गोविंद ॥ धृ. ॥
आनंद रे विठोबा झाला माझें मनीं झाला माझें मनीं ॥
देखिली विटेसहित पाउलें लोचनी ॥ १ ॥
न करी तपसाधन मुक्तीचे सायास मुक्तीचे सायास ॥
हाची जन्मोजन्मी गोड भक्तीचा रस ॥ २ ॥
तुका म्हणे आम्हां प्रेमा उणे तें कायी, उणें तें कायी ॥
पंढरीचा राणा आम्ही सांठविला ह्रदयीं ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.