जय जय कटिकर विठ्ठल चिन्मयसुख राशी ।
सर्वहि व्यापक ब्रह्म तूं पंढरपुरवासी ॥
पुंडलीकवरप्रद अपणां म्हणवीसी ।
निजभक्तांसव नाना नटवेषा धरिसी ॥ १ ॥
जय देव जय देव जय विठ्ठलराया ।
करुणामृतसुखसागर वंदित तव पाया ॥ धृ. ॥
भौमातटनिजनिकटीं राहुनियां देवा ।
विठ्ठल विठ्ठलस्मरणें तारीसी जीवा ॥
अखंड भजनानंदी दृढ धरुनी भावा ।
वैष्णव नाचति रंगणिं करितां तव सेवा ॥ २ ॥
रत्नखचित मुकुटादी तुळसीच्या माळा ।
आम्लाना कुसुमांच्या घालुनियां गळां ॥
कस्तुर्यादी तिलकें शोभविसी भाळा ।
मौनी वंदित चरणां अभेद गोपाळा ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.