धन्य दिवस अजि दर्शन संतांचे, दर्शन संतांचे ॥
नांदे तया घरी दैवत पंढरीचें ॥ धृ. ॥
धन्य पुण्यरूप कैसा झाला संसारू, कैसा झाला संसारू ॥
देव आणि भक्त दुजा नाही विचारू ॥ १ ॥
धन्य पूर्वरूप ओढवले निरुतें, पुण्य ओढवले निरुतें ॥
संतांचे दर्शन झालें भाग्यें बहुतें ॥ २ ॥
तुका म्हणे धन्य आम्हां जोडिला जोडी, आम्हां जोडिला जोडी ॥
संतांचे चरण आतां जीवे न सोडीं ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.