नरेंद्र दामोदरदास मोदी भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदींना २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान पदाची शपथ देवविली. मोदी स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत आणि या पदावर विराजमान होणारे स्वतंत्र भारतात जन्माला आलेले पहिले व्यक्ती आहेत.
त्यांच्या नेन्तृत्वाखाली भारतातील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने २०१४ लोकसभा निवडणूक लढली आणि २८२ जागा जिंकून अभूतपूर्व विजय मिळवला. एक खासदार म्हणून त्यांनी उत्तर प्रदेशची सांस्कृतिक नागरी वाराणसी आणि आपले गृहराज्य गुजरात येथील वडोदरा क्षेत्रातून निवडणूक लढली आणि दोनही ठिकाणी विजयी झाले.
त्यापूर्वी ते गुजरात राज्याचे १४ वे मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या अचाट कामामुळे गुजरातच्या जनतेने त्यांना सलग ४ वेळा (२००१ ते २०१४) मुख्यमंत्री म्हणून निवडून आणले. गुजरात विश्वविद्यालयातून राज्यशास्त्र विज्ञानात पदवी घेतलेल्या नरेंद्र मोदींना विकास पुरुष म्हणून ओळखले जाते आणि सध्या ते देशातील सर्वांत लोकप्रिय नेता आहेत. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर देखील ते सर्वांत जास्त फॉलोअर असणारे भारतीय नेता आहेत. टाईम पत्रकाने मोदींना पर्सन ऑफ द ईयर २०१३ च्या ४२ जणांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
अटल बिहारी वाजपेयींप्रमाणेच नरेंद्र मोदी देखील एक नेता आणि कवी आहेत. गुजराती भाषेव्यतिरिक्त ते हिंदीमध्ये देखील देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या कविता लिहितात.