राजीव गांधी इंदिरा गांधीचे पुत्र आणि जवाहरलाल नेहरूंचे नातू, भारताचे सातवे पंतप्रधान होते.
१९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी प्रचंड बहुमताने पंतप्रधान झाले होते. त्यानंतर १९८९ च्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि पक्ष दोन वर्षे विरोधी पक्ष राहिला. १९९१ च्या निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान तामिळनाडू मधील श्रीपेरंबदूर इथे एका भयंकर बॉम्ब स्फोटात राजीव गांधींचा मृत्यू झाला.
राजीवचा विवाह एन्टोनिया माईनो हिच्याशी झाला जी त्या वेळी इटलीची नागरिक होती. विवाहानंतर तिने नाव बदलून सोनिया गांधी हे नाव धारण केले.
राजीव गांधींना राजकारणात अजिबात रस नव्हता आणि ते एयरलाइन पायलटची नोकरी करत होते. आणीबाणीनंतर जेव्हा इंदिरा गांधीना सत्ता सोडावी लागली होती, तेव्हा काही काळासाठी राजीव परिवारासोबत परदेशात राहायला निघून गेले.
२१ मे १९९१ रोजी तामिळ दहशतवाद्यांनी एका आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात राजीव गांधींची हत्या केली.