गुलजारीलाल नंदा भारतीय राजकारणी होते. त्यांचा जन्म सियालकोट, पंजाब, पाकिस्तान मध्ये झाला होता. १९६४ मध्ये ते भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान बनले. कॉंग्रेस पार्टीशी एकनिष्ठ असलेले गुलजारीलाल नंदा प्रथम जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर १९६४ मध्ये कार्यवाहक पंतप्रधान बनले. आणि दुसऱ्यांदा लाल बहादुर शास्त्रींच्या मृत्यू नंतर १९६६ मध्ये ते कार्यवाहक पंतप्रधान बनले. त्यांचा कार्यकाल दोन्ही वेळा कॉंग्रेस पार्टीने आपल्या नवीन नेत्याची नेमणूक करेपर्यंतच राहिला. नंदा यांनी लेखकाची भूमिका निभावत अनेक पुस्तके लिहिली. ज्यांची नवे अशी आहेत - सम आस्पेक्ट्स ऑफ खादी, अप्रोच टू द सेकंड फाइव्ह इयर प्लान, गुरु तेगबहादुर, संत एंड सेवियर, हिस्ट्री ऑफ एडजस्टमेंट इन द अहमदाबाद टेक्सटाईल्स, फॉर ए मौरल रिव्होल्युशन आणि सम बेसिक कंसीडरेशन. गुलजारीलाल नंदा यांना भारत देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न (१९९७) आणि दुसरा सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान पद्मविभूषण या दोहोंनी गौरविण्यात आले.
नंदा दीर्घायुषी ठरले आणि वयाच्या १०० व्या वर्षी १५ जानेवारी १९९८ रोजी त्यांचे निधन झाले. एक स्वच्छ चारित्र्याचा गांधीवादी नेता या नजरेने त्यांच्याकडे नेहमीच पाहण्यात आले.