बुध्द भगवंताने बोधिसत्वावस्थेंतील हा आपला अनुभव सांगितला असला पाहिजे, त्वरीत प्रवास करण्यापासून फायदा होत नसून सावकाश प्रवास करण्यांत फायदा होतो, हा त्याचा स्वत:चा अनुभव होता. अशा रीतीने सावकाश प्रवास करूनच इतर श्रमणांकडून त्याने ज्ञान संपादन केलें आणि शेवटी आपला नवा मध्यम मार्ग शोधून काढला.

भिक्षुसंघासह चारिका

बुध्दत्व प्राप्त झाल्यावर भगवंताने बुध्दगयेहून काशीपर्यंत प्रवास केला आणि तेथे पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करून त्यांचा संघ स्थापला. त्यांना काशीला सोडून भगवान एकटाच परत राजगृहाला गेला, अशी कथा महावग्गांत वर्णिली आहे. पण हे पांचही भिक्षु त्या चार्तुमासनंतर भगवंताबरोबर होते, असें समजण्याला बळकट आधार आहे. राजगृह येथे सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोघे प्रसिध्द परिवाज्रक बुध्दाचे शिष्य झाल्यानंतर बौध्द संघाच्या भरभराटीला आरंभ झाला. आणि तेव्हापासून बुध्द भगवंताबरोबर बहुधा लहान मोठा भिक्षुसंघ राहत असे, व त्याची चारिका भिक्षुसंघासह वर्तमान होत असे. असे क्वचितच प्रसंग आहेत की, भगवान भिक्षुसंघाला सोडून एकटा राहिला.

फिरतीं गुरूकुलें.

बुध्दसमकालीन सगळे श्रमणसंघ व त्यांचे पुढारी अशाच रीतीने प्रवास करीत असत. बुध्दापूर्वी आणि बुध्दसमकालीं ब्राह्मणांची गुरूकुलें होतीं. त्या ठिकाणीं वरिष्ठ जातीचे तरूण जाऊन अध्ययन करीत असत. परंतु त्या गुरूकुलांचा फायदा बहुजनसमाजाला फार थोडा मिळे; ब्राह्मण वेदाध्ययन करून बहुधा राजाश्रय धरीत; क्षत्रिय धनुर्विद्या शिकून राजाच्या नोकरींत दाखल होत. आणि जीवक कौमारभृत्यासारखे तरूण आयुर्वेद शिकून वरिष्ठ जातीच्या उपयोगीं पडत व अखेरीस राजाश्रय मिळविण्याची खटपट करीत. परंतु श्रमणांची गुरूकुलें अशी मुळीच नव्हतीं ते प्रवास करतां करतांच शिक्षण घेत आणि सामान्य जनांत मिसळून धर्मोपदेश करीत. येणेंकरून बहुजनसमाजावर त्यांचे वजन फार पडलें.

भिक्षुसंघांत शिस्त

बुध्द भगवंताच्या भिक्षुसंघात उत्तम शिस्त होती. भिक्षुनी अव्यवस्थितपणें वागणें त्याला मुळीच पसंत नव्हतें. यांसंबधी चातुमसुत्तांत (मज्झिमनिकाय न. ६७) आलेली कथा येथे थोडक्यात देणें योग्य वाटतें.

भगवान चातुमा नावाच्या शाक्यांच्या गावीं आमलकीवनांत राहत होता. त्या वेळीं सारिपुत्त आणि मोग्गलान पांचशें भिक्षूंना बरोबर घेऊन चातुमेला आले. चातुमेंतील रहिवासी भिक्षूंच्या आणि सारिपुत्त मोग्गल्लानाबरोबर आलेल्या भिक्षूंच्या परस्परांशीं आगतस्वागतादिक गोष्टी सुरू झाल्या. बसण्या उठण्याच्या जागा कोठे, पात्रचीवरें कोठे ठेवावीं इत्यादिक विचारपूस करीत असतां गडबड होऊं लागली. तेव्हा भगवान आनंदाला म्हणाला ''कोळी मासे पकडतांना, जशी आरडाओरड होते, तशी तेथे का चालली आहे?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel