माझें पूर्वपुण्य विठोबाचे पाय । करील तें होय पांडुरंग ॥१॥

बळिवंत त्याचा त्रिभुवनीं ठसा । करिल आकाशा चवघडी ॥२॥

सप्तही सागर जयाचे अंगुष्टीं । त्यासी आटाआटी कासयाची ॥३॥

तुका म्हणे राव धरी हातीं रंक । आपें सम तुक दाखवी तो ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel