बरें देवपण कळों आलों मज । आतां कोण बूज राखे तुझी ॥१॥

मारिलें कां मज सांग तूं तयारी (?) । आतां सरोवरी तुज मज ॥२॥

आम्ही जें जें बोलों तें तें तुझ्या अंगीं । देईन प्रसंगीं शिव्या आजी ॥३॥

निलाजर्‍या तुज नाहीं याती कुळ । चोरटा शिनळ जगामाजी ॥४॥

गाढव कुतरा आहे मज ठावा । बैल तूं केशवा भारवाही ॥५॥

तुका म्हणे मज खवळिलें भांडा । आतां धरीं तोंडा न धरवे ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel