पूर्वीं अढळपद दिधलें एकासी । क्षीरसिंधुवासी केलें एका ॥१॥

एकाचे साहिले गर्भवास अंगें । तैसें मी न मागें संकटाचें ॥२॥

न घालीं संकट संसाराचें कांहीं । स्वर्ग मोक्ष तेही न लगती ॥३॥

तुका म्हणे चरण दावीं डोळे भरी । पावलों श्रीहरि मग सर्व ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel