नेणें कांहीं शब्द उत्तम बोलातां । नायके सांगतां एक गोष्टी ॥१॥

खुणे दावी हातें सर्वज्ञा नेत्रांसी । तेव्हां होय त्यासी श्रुत भाषा ॥२॥

नाहीं तरी येर येरासी सारिखें । मूर्खासी पारिखें तेंचि होय ॥३॥

तुका म्हणे तैसें नको देऊं देवा । बोलुनियां जीवा निववावें ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel