अरिष्टनिवारण, शत्रुनाश, विजयप्राप्ती, पुत्रप्राप्ती इ.कार्यासाठी केला जातो.
हे शाबरी कवच श्रीदत्तात्रेय व नवनाथांच्या प्रतिमेसमोर ध्यानस्थ होऊन वाचावे. महत्वाच्या कार्यसिद्धी किंवा फलश्रुतीसाठी नेहमी याचे वाचन विषम संख्येच्या अंकात करावे या संख्या म्हणजेच तीन, पाच, सात, नऊ, अकरा असे आहे. त्वरित फलप्राप्तीसाठी आपल्याला दिवसभरात जेव्हा वेळ मिळत तसे आपल्या सोयीनुसार पंधरा, एकोणीस, एकवीस वेळा सलग अकरा ते एकवीस दिवस पठण करावे. याचे पाठ विषमसंख्येतच करावेत असे म्हणतात.
प्रवासात असताही त्यात खंड पडू देऊ नये. हि “श्रीशाबरी विद्या” श्री देवादिदेव महादेवांकडून प्रसवली आहे. पुढे नवनाथांच्या गुरूंनी म्हणजेच श्रीमच्छिंद्रनाथ, श्रीगोरक्षनाथ इत्यादींनी या विद्येच्या जोरावर अनेक अघटित कृत्ये केली आहेत.
शाबरी शिवशंकरांच्या पार्वती मातेचेच एक नाव आहे. नवनाथांनी कठोर तपश्चर्येने पार्वती देवीला प्रसन्न करून घेतले होते. ‘शाबरी कवच’ हे नाथ संप्रदायात अतिशय प्रसिद्ध मंत्रोच्चारण आहे. शबरी कवचाचे अनुष्ठान केल्यास भूतबाधा, दैवीप्रकोप, सांसारिक आपत्ती , दारिद्रय संकटे दूर होतात. या कवचाने साधकावर नवनाथांची कृपा होते यात तिळमात्रही संशय नाही.
महत्वाच्या फलश्रुतीसाठी या शाबरी मंत्राची विषम संख्येत पारायणे करावीत, म्हणजे तीन, पाच सात, अकरा इत्यादी. लगेच फलप्राप्तीसाठी हि विषम संख्येतील पारायणे पंधरा, एकोणीस किंवा एकवीस दिवस न चुकता, न खंड पडत करावीत. हि शाबरी मंत्राची व कवचाची पारायणे खूप भक्तीभावाने व एकग्रचित्ताने करावी.
साधक प्रवासात असेल तरी त्या कवचाच्या पारायणात खंड पडू देऊ नये. हे मंत्रोच्चारण करताना खंड पडू नये अशी वेळ निवडावी. तसेच हे अनुष्ठान सुमुहूर्त पाहून सुरू करावे. अनुष्ठनाला बसण्यासाठी मृगासनात बसावे
त्वरित फलश्रुतीसाठी आपण अनुष्ठान करत असाल तर पुढील काळजी घेणे अनिवार्य आहे.
१. अभक्ष भक्षण टाळावे. म्हणजेच अंडी, चिकन, मटण, मासे व इतर कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ सेवन करू नयेत.
२. खोटे बोलणे किंवा खोटे वागणे टाळावे.
३. संपूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे.
४. नवनाथांची मानस पूजाही करावी.
५. शक्य तितके सात्विक जेवावे.
नित्य अनुष्ठान करताना इतक्या कडक नियमांची आवश्यकता नाही तथापि साधकाला शक्य असेल तर साधकाने नियमितपणे साधकासारखे वागणे केंव्हाही योग्यच असते.