मेरी मेयर हे अमेरिकेच्या इतिहासातले एक नाव आहे. मेरी अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन एफ. केनेडी यांची जवळची मैत्रीण होती.

मेरी वॉशिंग्टन डी.सी. मधील एक प्रसिद्ध व्यक्ती होती. 12 ऑक्टोबर,१९६४ रोजी तिची गोळी मारून हत्या करण्यात आली.

मेरी जेंव्हा चालण्यासाठी बाहेर पडली त्या दिवशी ती परतलीच नाही. जवळच असलेल्या मेकॅनिकने गोळीचा आवाज ऐकल्यावर तिथे धाव घेतली, तेंव्हा त्याला एक अज्ञात इसम मेरीच्या मृतशरीराजवळ उभा असलेला दिसला.

मेकॅनिकच्या जबाबानुसार तो माणूस कृष्णवर्णीय होता त्याने फिकट रंगाचे जाकेट, गडद रंगाची टोपी आणि पँट घातली होती.  मेरीला हृदयात आणि डोक्याच्य अमागे गोळी मारण्यात आली होती. दोन्ही गोळ्या फारच जवळून झाडल्या गेल्या होत्या. तिला गोळ्या मारल्यानंतर  काही क्षणातच एक कृष्णवर्णीय अमेरिकन रेनॉल्ड क्रंप याला जवळच अटक करण्यात आली. क्रंपकडे बंदूक सापडली नाही किंव्हा त्याने कधीही बंदूक बाळगल्याचे पुरावे मिळाले नाहीत. पुराव्या अभावी त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले.

मेरी मेयरची केस अमेरिकेतील एक न उलगडलेला खटला होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel