बॉब क्रेन

बॉब क्रेन हा एक सुप्रसिद्ध अभिनेता होता. त्याने हॉगनस् हिरो या मालिकेत कर्नल रॉबर्ट इ. हॉगन यांची भुमिका साकारली होती. या भुमिकेपेक्षा बॉब क्रेन ज्या परिस्थतीत मरण पावला त्यामुळे त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली. बॉब क्रेन जुन १९७८ मध्ये ऍरिझोना मधील स्कॉटसडेल शहरात विनफिल्ड प्लेस बिल्डींग मध्ये रहात होता. या काळात तो विंडमिल डिनर थिएटर मध्ये "बिगिनर्स लक" ह्या नाटकात काम करत होता. २९ जुनला बॉब क्रेनच्या नशीबाने कदाचित त्याला साथ दिली नाही. त्याच्या बरोबर काम करणारी अभिनेत्री विक्टोरिया एन बेरी हिला बॉब क्रेनचा मृतदेह त्याच्याच घरात सापडला. विक्टोरिया बॉबला त्यादिवशी दुपारी जेवणासाठी बाहेर भेटणार असे ठरले होते. पण बॉब दिलेल्या वेळेत आलाच नाही म्हणुन विक्टोरिया त्याच्या घरी त्याला भेटायला गेली.

विक्टोरियाने हा घडलेला प्रकार पाहुन पोलिसांना तडक सुचना दिली. पोलिसांनी तपास चालु केला. पोलिस जेंव्हा त्याच्या घरात आले तेंव्हा त्यांना बॉब मृतावस्थेत सापडला. त्याच्या गळ्याभोवती इलेक्ट्रीकची वायर बांधली होती. त्यावर मरेपर्यंत वार करण्यात आले होते. त्यावर वार करायसाठी जे शस्त्र वापरले होते ते काही आज तागायत मिळाले नाही याउपर कदाचित कॅमेरा ठेवायचा ट्रायपॉड वापरला गेला असण्याचे अंदाज तपास करणार्‍याने वर्तवले. या सगळ्या प्रकारासाठी पोलिसांनी बॉबचा मित्र जॉन हेन्री कार्पेंटर याला जबाबदार ठरवले. त्याकाळी डि.एन.ए टेस्टींगची उपकरणे उपलब्ध नसल्याने फारच जुजबी पुरावे गोळा करता आले. त्यामुळे नुसत्या शंकेच्या आधारावर जॉनला पोलिस अटक करु शकत नव्हते. काही अहवालांनुसार कार्पेंटरला बॉबच्या राहत्या घरात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. परंतु पहिल्यंदा जेव्हा तो आला तेव्हा पोलिसांचा गराडा पाहुन त्याला आश्चर्य वाटले नाही. जणु काही त्याला हे घडणार आहे हे माहिती होते. या त्याच्या हालचाली त्याला शंकेच्या घेर्‍यात उभ्या करणार्‍या होत्या. तपासकर्त्यांनी जॉन कार्पेंटरची गाडी ताब्यात घेतली. त्यांना गाडीमध्ये रक्ताचे काही डाग आणि थेंब मिळाले. हे रक्त बॉबच्या रक्त गटाशी मिळते जुळते होते पण ते नेमके त्याचेच आहे का यासाठी त्यांच्या कडे पुरेशी संसाधने नसल्याने हा पुरावाही अर्धवट राहिला. यामुळे कुणालाही बॉबच्या खुनाच्या आरोपाखाली पकडले गेले नाही.

१९९०  साली मॅरीकोपा काऊंटी यांनी ह्या गुन्ह्याचा पुन्हा नव्याने तपास चालु केला. तोपर्यंत डि.एन.ए. टेस्टची उपकरणे वापरात आली होती. त्यांनी गाडीत सापडलेले ते रक्ताचे नमुने नव्याने तपासले. यावेळी तपासकर्त्याला एक नवी माहीती मिळाली. हा रक्ताचा नमुना बॉबच्या मेंदुच्या पेशींचा आहे. या माहितिच्या आधारावर त्यांनी जॉन कार्पेंटरला अटक केली. १९९२ साली त्याला कोर्टात हजर करण्यात आले. परंतु पुरावे गहाळ झाल्याने हि केस पुढे सरकलीच नाही. कोर्टाने जॉन कार्पेंटरची निर्दोष मुक्तता केली. नंतर जॉन या आरोपातुन मुक्त होऊन १९९८ पर्यंत जगला. जॉन कार्पेंटरला कोर्टाने निर्दोष सोडल्यामुळे बॉबचा मृत्यु हा न उलगडलेल्या खुनांच्या यादित गेला.

ही केस आपल्याला आत्ताच भारतात घडलेल्या सुशांत सिंग राजपुतच्या केस ची आठवण करुन देते.  ती केस अश्या न सुटलेल्या केसच्या रांगेत येऊन बसु नये इतकीच ईच्छा..!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel