सप्टेंबर १७, १९२२ साली न्यु जर्सीच्या न्यु ब्रन्सविक मधील ऍप्पल ऑर्किडमध्ये दोन मृतदेह सापडले. त्यातला एक आदरणीय एडवर्ड व्हिलर हॉल वय ४१ आणि दुसरा एलनॉर मिल्स वय ३४ हे होते. त्यातल्या एलनॉर मिल्सला तीन वेळा बंदुकीतुन गोळी झाडुन मारले होते. एडवर्ड व्हिलर हॉल यांना दोन्ही भुवयांच्यामध्ये एका बंदुकीच्या वारात मारले होते. त्यांच्या मृतदेहांवर त्यांनी एकमेकांना पाठवलेल्या प्रेमपत्रांचा खच होता. एडवर्ड हॉल यांच्या पायावर त्यांचे कॉलिंग कार्ड ठेवण्यात आले होते.

खुन्याला कदाचित या उभयतांचे अनैतिक संबंध जगासमोर उघडकिस आणायचे असावेत. म्हणुन की काय त्याने हा सगळा प्रकार केला होता. गुन्ह्याची जागा अतिशय अयोग्यरित्या हाताळली गेली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्यापरिने सर्वोत्तम काम केले होते. या दोन्ही मृतकांवर शवविच्छेदन केले गेले नव्हते. या घटनेच्या साधारणतः चार वर्षांनंतर एका पत्रकाराला एडवर्डच्या पायावर ठेवलेल्या कॉलिंग कार्डची आठवण झाली. कदाचित त्या कार्डावर खुन्याच्या बोटांचे ठसे असतील असा अंदाज आला. पोलिसांना सांगितल्यावर त्यांनी दुबार या केसची तपासणी केली. त्यावर एडवर्ड हॉलच्या मेव्हण्याच्या बोटांचे ठसे होते. या प्रकरणात एडवर्डच्या मेव्हण्याची बायको तिचे दोन भाऊ विलियम्स आणि हेनरी शिवाय त्यांचा चुलत भाऊ अजुन एक हेनरी हे सगळे शंकेच्या भोवर्‍यात होते. त्यांची तपासणी चांगली महिनाभर लांबली. रोज प्रत्येकाला सहा तास पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जावे लागायचे. या सगळ्यातुन काहिहि निशपन्न झाले नाही. ही केस पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाईलमध्ये धुळ खात पडली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel