दुपारी चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहेरा पुसून देवाला नवीन पोषाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती होते. या वेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात. धूप, दीप ओवाळून दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. त्या वेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी
'जेवी बा सगुणा सख्या हरी, जेवी बा सगुणा,
कालविला दहीभात आले मिरे लवणा,
साय दुधावरी साखर रायपुरी कानवले चिमणा,
उद्धवचिद्घन शेष ही इच्छितो गोपाळा रमणा''
हे पद म्हणतात. शेवटी 'युगे अठ्ठावीस' ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.