ओवाळू आरती । आता पुरुषोत्तम प्रभुला ।

नियम व्रते पाळिती । पावतो सत्वर भक्ताला ॥ ध्रु. ॥

दरवर्षाचा । दशदिवसांचा । मळ काढुन केला ।

अधीक महिना । तीस दिनांचा । काळ मेळ बसविला ।

मंगल कार्ये । वर्ज्य त्यामधी । पुण्यकर्म करिती ।

मलमासाला । कृष्णकृपेने । पुरुषोत्तम मानिती ।

अंधाराचा नाश कराया । दिव्य दीप लाविला ।

नियम व्रते पाळिती । पावतो सत्वर भक्ताला ॥

ओवाळू आरती. ॥ १ ॥

गुणसुंदरीला । द्रौपदिला अन् । चंद्रकलाराणिला ।

अधिकमासव्रत । पुण्याईने । प्रसन्न प्रभु झाला ।

स्नान, दान, जप, । मौनभोजने । कुबुद्धि सारावी ।

दुर्व्यसनांचा त्याग करावा । चैन सर्व सोडावी ।

निर्मळगुरुजी पुण्यप्रद हा । मार्ग दावि सकला ।

नियम, व्रते पाळिती । पावतो सत्वर भक्ताला ॥

ओवाळू आरती ॥ २ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel