जय जय लक्षुमिकांता शेषशायी नारायणा हो ।
भक्तजनातें रक्षुनि करिसी तापत्रयहरणा हो ॥धृ॥
आदि अनादि सर्वा विश्वासी तूं निज आधार हो ।
तुझिया ठायीं कल्पित जाले जगनग चराचर हो ॥
त्रिगुणात्मक होउनिया ब्रह्माविष्णू महेश्वर हो ।
स्वच्छंदानें करिसि उत्पत्ति स्थितीं आणि संहार हो ॥१॥
युगायुगाचे ठाईं जन्मी येउनि वारंवार हो ।
मच्छकच्छवराह घेसी सिंहादिक अवतार हो ॥
शरणागत रक्षुनिया करिसी दु:खाचा परिहार हो ।
दुष्टजनातें दंडुनि हरिसि पृथ्वीचा भूभार हो ॥१॥
भृगजळवत हा सेवुनि लटिका मायावी संसार हो ।
नाना लीला दावुनि शेवटिं होसी निर्विकार हो ।
सच्चितसुखघन आत्मा निर्मळ सर्वांचें निजसार हो ॥
नीरंजनगुण गातो नकळे तव स्वरुपाचा पार हो ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to इतर आरती संग्रह