जयदेव जयदेव जय भगवद्गीते । तापत्रय संहारुनि वारी भवदुरीतें ॥धृ॥
पार्थरथावरि बसले असतां भगवान ।
त्याच्या मुखकमळांतुनि जालिसि निर्मांण ।
तव श्रवणाच्या योगें पंडूनंदन ।
मोहातीत होउनिया जाला पावन ॥१॥
अष्टादश अध्यायीं तूझा विस्तार ।
लेखनपठ्णश्रवणें उद्धरिसि नर ।
हरिहर - ब्रह्मा स्तविति तुज वारंवार ।
अगाध महिमा नकळे कवणासी पार ॥२॥
श्रीकृष्णें काढुनिया वेदाचें सार ।
प्रगट केली ब्रम्हविद्या परिकर ॥
सर्वहि विश्वजनाचा केला उद्धार ।
निरंजनपद देउनि हरिला संसार ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to इतर आरती संग्रह