जयदेव जयदेव जयजी अवधूता ॥ अर्तें आरति करूं स्वामी श्रीदत्ता ॥ध्रु०॥
जगव्यापक जगजीवन योगी अवधूता ॥ हरि हर ब्रह्मा देव त्निरूप अमूर्ता ॥
दश इंद्रियातीत दिगंबर दत्ता ॥ सच्चित्सुखमयस्वरुपा अमुपा अव्यक्ता ॥१॥
सिद्ध साधक योगी मरतकमणि सकळां ॥ ईक्षणमात्नें जड जीव तारिसि तूं हेळा ॥
नट नाटयें योगरूपें छेदक भवमूळा ॥ दीन दयाकर गुरुवर अवधूत अवलीळा ॥२॥
निज सुखदायक देशिक नायक निजमूर्ति ॥ संसुतिखंडण योगी मंडणविश्रांती ॥
रंगीं रंगुनि अनन्य भावें जे भजती ॥ अभिवंदुनि मग त्यांतें वोळगति मुक्ती ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel