उडत्या तबकड्यांच्या विरोधात सर्वांत मोठा तर्क असा आहे की ब्रम्हांडाचे अंतर एवढे विशालकाय आहे की एवढे भयंकर अंतर पार करून तत्बकड्या पृथ्वी पर्यंत येऊ शकत नाहीत. पृथ्वीवर पोचण्यासाठी प्रक़्कशच्य वेगापेक्षा अधिक वेगाने चालणारे यान हवे जे मानवाला ज्ञात असलेल्या भौतिक श्गास्त्राच्या नियमांच्या विरुद्ध आहे. पृथ्वीच्या सर्वांत जवळचा तारा देखील ४ प्रकाश वर्ष दूर आहे, प्रकाशाच्या वेगा पेक्षा जलद चालणार्या यानाला देखील तिथून पृथ्वीवर यायला ४ वर्ष लागतील. येऊन जाऊन किमान ८ वर्षांच्या या यात्रेसाठी विशालकाय यान पाहिजे. आतापर्यंत उडत्या तबकड्यांच्या जेवढ्या बातम्या आल्या आहेत त्यापैकी एकही विशालकाय नाहीये.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.