कार्दशेव च्या मते जर एखादी संस्कृती दर वर्षी उर्जेच्या वापराच्या दारात प्रगती करत राहिली तर ती काही हजार वर्षांच्या काळात वर्ग १ मधून वर्ग २ मध्ये जाईल.
आपली मानव संस्कृती अजून वर्ग 0 मधेच आहे. आपण अजूनही मृत वनस्पती, तेल आणि कोळसा यांनीच आपली यंत्र चालवतो. सूर्याच्या उर्जेचा अतिशय सूक्ष्म अंश आपण वापरतो. परंतु आपण वर्ग १ च्या संस्कृतीचा पहिला टप्पा पाहू शकतो. इंटरनेट ने वीरग १ च्या संस्कृती प्रमाणे संपूर्ण विश्व एकत्र बांधले आहे. युरोपियन युनियन वर्ग १ च्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने एक पाउल पुढे आहे. इंग्रजी ही जगाची भाषा आहे आणि विज्ञान आणि अर्थव्यवस्थेची भाषा बनली आहे. आशा आहे की लवकरच पृथ्वीवर प्रत्येकाला समजणारी अशी ती भाषा बनेल. स्थानिक संस्कृती, भाषा आणि रिती रिवाज रूढी परंपरा या आपापल्या जागी विकसित होताच राहतील, परंतु एक विश्व संस्कृती, विश्व भाषा, विश्व अर्थव्यवस्था यांचा जन्म होईल जी युवा संस्कृती आणि व्यापार बुद्धी द्वारा संचालित होईल.
अर्थात आपली संस्कृती वर्ग 0 पासून वर्ग १ मध्ये संक्रमण करू शकेल याची काहीही शाश्वती नाही. हे संक्रमण अतिशय भयंकर आहे आणि कदाचित काही संस्कृतीच तो टप्पा पार करू शकतील. वर्ग 0 संस्कृतीत साम्प्रदायिकता, कट्टरता आणि वर्ग भेद जोरावर असतात. जातीयवाद आणि धार्मिक रूढी या संक्रमणाला पराभूत करण्यात कोणतीही कसूर ठेवणार नाहीत. आपण आपल्या आकाशगंगेत कोणतीही वर्ग १ ची संस्कृती पाहू शकत नाहीयोत. याचे एक कारण असेही असू शकेल की अजूनपर्यंत कोणतीही संस्कृती वर्ग 0 मधून वर्ग १ मध्ये पार झालेली नाही, तर त्या आधीच संपुष्टात आलेली आहे. कधी काळी जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या ताऱ्याची यात्रा करू तेव्हा आपल्याला त्यांच्या ग्रहांवर संस्कृतीचे अवशेष दिसू शकतील, ज्यांनी कोणत्या तरी प्रकारे स्वतःला नष्ट करून घेतले आहे. कदाचित त्यांच्या वातावरणात असह्य रेडियो लहरी उत्पन्न झाल्या असाव्यात किंवा वातावरण सहन करण्या पलीकडे गरम झाले असावे. परंतु आपण हे तेव्हाच पाहू शकू जेव्हा आपण स्वतःला नष्ट होण्यापासून वाचवू. जेव्हा एखादी संस्कृती वर्ग ३ मध्ये समाविष्ट होते तेव्हा त्यांच्याकडे अंतराळात आकाशगंगेच्या पलीकडे जाण्यासाठी साधने उपलब्ध असतात. ते पृथ्वीवर देखील येऊ शकतात. हॉलीवुड चा सिनेमा 2001 ए स्पेस ओडीसी प्रमाणे वर्ग ३ च्या संस्कृती आकाश गंगांमध्ये संस्कृतींच्या शोधार्थ यान पाठवू शकतात.
उच्च वर्गातील संस्कृती खालच्या वर्गातील संस्कृतींवर आक्रमण करू शकतील का?