देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर

या दोन ओळीतच शरीर हे ईश्वराचे अधिष्ठान आहे हे कळते ते सुदृढ शुद्ध ठेवणे हाच खरा धर्ममार्ग  आज तर ती काळाची गरज होवून बसलीये . जगाच्या कल्याणाकराता आपल्या थोर महात्म्यांनी स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस स्वामी दयानंद सरस्वती व अनेक इतर यांनी अध्यात्मिक क्षेत्रात जे कार्य केले ते निरामय शरीरा व मन यामुळेच म्हणजे दैवी सामर्थ्य आणि मनाचा जवळचा संबध आहे असे म्हणता येईल . जगातील सर्व भोग उत्तम आरोग्याशिवाय निरर्थक.

सूर्यप्रकाश हवा पाणी आहार विहार निद्रा व्यायाम त्याग आणि संयम यांच्यापासून आरोग्याची जोपासना करता येते या सर्व तत्वांमुळे शरीरधर्म व अध्यात्मिक धर्म भक्कम उभा राहू शकतो कि ज्याचा उपयोग आत्मशुद्धीसाठी होतो यासाठी शरीरशुद्धी महत्वाची. शरीर हे भगवंताचे निवास्थान आहे हे लक्षात ठेवून ते शुद्ध पवित्र ठेवले कि पावित्र्य शुद्धता शरीरात वास करते.

मुखचर्येच्या प्रत्येक अवयवांवरुन मनुष्यस्वभाव त्याची मानसिक पातळी वैचारिक पातळी त्यांच्या सवयीचा वृत्ती चाही अंदाज बांधता येतो यासाठी निरामयता मनाची शरीराची हवी.

मेद मज्जा अस्थि स्नायू यांच्या परिणामामुळे मनुष्याचा स्वभाव चारित्र्य  वर्तन शील आणि भावना ओळखता येतात.

मेदप्रधान ...व्यक्तीचा कल सुखी समाधानी आयुष्याकडे असतो . बुद्धिमत्ता व्यव्हारकुशलता यात ते चतुर ठरतात गुबगुबीत मांसलप्रधान व्यक्ती  मेदप्रधान म्हणता येईल.ठेंगणा बांधा रुंद तोंड लहान नाक पोट पुढे आलेले अशी शरीररचना असते असे लोक खाजगी व सामाजिक जीवन वेगवेगळे ठेवणारे गूढ असतात.

मज्जा ..म्हणजे मानवी मनात निर्माण होणारी संवेदना जागृत होणारी प्रत्येक भावना आणि नंतर होणारी मानसिक क्रिया याचे ज्ञान मेंदूला पोहचवणारी शक्ती म्हणजे मज्जा वाहक शक्ती . मज्जा प्रधान लौक तीव्र बुद्धी तडफदार व्यक्तीमत्वाचे तर प्रेम दया संताप ही या भावना जपणारे असतात चेहरा लंबगोलाकृती मोठे कपाळ पाणीदार डोळे वृत्तीने आळशी सुस्त असतात. बोलणे तर्कशुद्ध सत्याधिष्ठीत अशा व्यक्ती सर्व क्षेत्रात आढळतात.

अस्थिप्रधान ..व्यक्ती अंगकाठीने उंच विशाल कपाळ हाताची निमुळती नखे पण हाडापेराने मजबूत असतात हे फक्त ढोबळ अवलोकन

स्नायूप्रधान ...व्यक्ती या आखूड मानेच्या कमी उंचीच्या  गोल हनुवटीच्या असतात. कलाकार सौंदर्य संवेदनशीलता असलेल्या अशा व्यक्ती आसतात.

मानवी मनोधर्म स्वभाव शरीररचना यावर कदाचित निर्णायक विधान करणे अपूर्ण ठरेल या व्यक्तींच्या सर्व अंगभूत लक्षणांचा अभ्यास करुन ती व्यक्ती कशी आहे याबाबत अंदाज बांधता येईल यामधे डोक्याचा आकार , रंग, त्वचेचा रंग पोत याचा सखोल अभ्यास करुन मुखचर्येवरुन मनुष्य  स्वभाव मानसिक वैचारिक मते सवयी याचा आढावा घेता येतो मात्र शरीर व मन यात समतोल आरोग्यपूर्ण हवा ते आपल्याच हातात आपले आरोग्य आपली जबाबदारी असेच सध्या म्हणावे लागेल.

मनुष्य वाचता येतो असे म्हणतात तो या सगळ्या चा आधार तर बैठक उत्तम मन आरोग्य याची असावी लागेल.

मग आधी मानसिक कि आधी शारिरीक आरोग्य हा प्रश्न विचारलाच जावू नये कारण उत्तम मन असेल तर आरोग्य उत्तम राहिलच दोन्ही परस्परपूरकच ..यासाठी हवे अशा विशेषतः नी युक्त निरामय शरीर..एक अधिष्ठान उत्तम आरोग्याचे..पुन्हा सगळे आपल्या तच ही आत्मशक्ती वाढवून शरीर निरामय ठेवण्यास मदतच होते.

सध्या आरोग्य हा ऐरणीचा मुद्दा बाकी सर्व गोष्टी महत्त्वाच्याच तरीही  हे सर्वांना मान्यच ....वेळ आपल्या हातात नाही पण आरोग्य...अन्  शरीरावरुनही व्यक्ती ची ओळख मनाप्रमाणे ही होतेच  .. हाच विचार मांडण्याचा एक माझा प्रयत्न ..!!

व्यक्ती सापेक्षता

© मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel