दिल्ली...भारताची आजची राजधानी...केवळ आजच्या कळताच नाही परंतु पूर्वीच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाला भारताच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे...अनेकांनी ही दिल्ली जिंकण्यासाठी प्रयत्न केला. त्यात बरेच राजे यशस्वी झाले होते...ज्यांनी ज्यांनी ही दिल्ली जिंकली , त्यांचे नाव इतिहासात कोरले गेले. दिल्ली जिंकणाऱ्या बऱ्याच शासकांची नावे इतिहासात सतत  घेतली जातात. पण एक योद्धा असा आहे की ज्याने दिल्ली जिंकली, तीही ३५० वर्षात कोणाही हिंदू राजाला ना जमलेला पराक्रम...पण तरीही त्याचा इतिहास लोकांनां माहीत नाही....ती व्यक्ती म्हणजे हेमू.. ते इ.स.च्या १६ व्या शतकातील उत्तर भारतातील एकमेव हिंदू सम्राट होते.
      एक साधा मीठ विक्रेता म्हणून जीवनाला सुरुवात केलेला हेमू, आपल्या कर्तबगारीने सूरी वंशाच्या आदिलशाह सूरी याचा सेनापती झाला आणि प्रमुख  पदांपर्यंत पोहोचला. वैयक्तिक गुण तथा कार्यकुशलतेमुळे तो आदिलशाहच्या दरबारातील प्रधानमंत्री बनला होता.तो राज्यकार्य व्यवस्था योग्यतापूर्वक करत होता. आदिलशाह स्वत: था और आपल्या कार्यांचा भार तो हेमूवर टाकत होता. कन्नौजच्या जवळ बिलग्राममध्ये एका भयंकर युद्धात शेरशाह सूरीने हुमायूनला करारी शिकस्त दिली. हुमायून भारत सोडून काबूलला पळून गेला आणि दिल्लीवर सूरी वंशाचे आधिपत्य आले.
       ज्या वेळी हुमायूनचा मृत्यू झाला तर या वेळी आदिलशाह मिर्झापूरजवळ चुनारमध्ये रहात होता. हुमायून च्या मृत्यू ची वार्ता ऐकून हेमू आपल्या स्वामीकडून युद्ध करण्यासाठी  दिल्लीकडे गेला. त्याने आधी आग्रा व नंतर दिल्ली जिंकून घेतली.  हेमूच्या युद्ध कौशल्य, पराक्रम व वीरता यामुळे आगरा का मुगलवंशी  इस्कंदर खान उज्बेग हल्ल्याच्या आधीच पळून गेला. या प्रकारे आग्रा हेमूच्या कब्जात आला . त्यानंतर हेमू ने दिल्लीला कूच केले. हेमूच्या रणनीती पुढे  तरदी बेग टिकला नाही. ७ ऑक्टोबर १५५६ ला दिल्लीच्या ऐतिहासिक किल्ल्यात हेमूचा विधीवत वैदिक पद्धतीने राज्याभिषेक झाला. या प्रकारे पृथ्वीराज चौहान यांच्या निधनानंतर ३५० वर्षांनंतर दिल्लीच्या तख्तावर  पहिल्यांदाच हिंदू सम्राट बसला. त्याने विक्रमादित्य पदवी धारण केली व हेमू आता "सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य" बनला.
      उत्तर हिंदुस्तानात पंजाबपासून बंगालपर्यंत त्याने अफगाण बंडखोर, हुमायून व अकबराच्या मुघल फौजा यांच्याशी सुमारे २२ लढाया एकदाही पराभूत न होता जिंकल्या. मध्ययुगीन भारताचा नेपोलियन अशीही पदवी त्यांना देण्यात येते.
         यानंतर झाली इतिहासातले महत्त्वाची लढाई...हेमू आणि अकबराचे सैन्य पानिपतच्या रणांगणावर भिडले. हेच ते प्रसिद्ध पानिपतच्या दुसरे युद्ध.
हेमच्या विशाल व बहादूर सेनेसमोर  मुघल सैनिक कुठे टिकणार होते. असे वाटत होते की एका दिवसात युद्ध समाप्त होईल. परंतु तेव्हाच इतिहासाने एक खतरनाक वळण घेतले. हेमूच्या डोळ्यात बाण घुसला.  हेमूचा माहूत मारला गेला. मुघल सैनिकांनी संधी साधून हेमूला बंदी बनवले. आपल्या परमवीर राजाला बंदी केल्याची खबर ऐकून हेमूची सेना पराभूत झाली. इतिहास बदलता बदलता राहिला.
हेमूला पकडून त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
     हेमूच्या सेनेत  30 टक्के हिन्दू व ७० टक्के अफगाण सैनिक होते. पण हेमूने दोन्हीत काही भेदभाव केला नाही.
     हिन्दूंना जबरदस्तीने मुसलमान बनवण्याच्या क्रूरतेच्या काळात महान हिंदू राजा हेमूची कारकीर्द महत्त्वाची ठरते. पृथ्वीराज चौहानांनंतर ३५० वर्ष  हिंदू राजाची प्रतीक्षा करणार्या दिल्लीच्या गादीवर पुन्हा एकदा हिन्दू सम्राट बसला.
    मात्र दुर्दैवाने आपल्याला इतिहासात मात्र हेमुची प्रतिमा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात हरलेला राजा अशीच एका वाक्यात केली जाते. आम्हास अकबर कसा महान राजा हे सांगितले जाते मात्र त्याच अकबराने हेमचंद्र आणि त्याच्या वृध्द पित्याचा कसा निर्घृणपणे वध केला, हे मात्र सांगितले जात नाही.
     हेमचंद्र विक्रमादित्य सारख्या वीर योद्ध्याचा इतिहास लोकांनां समजणे आवश्यक आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
dvdaware39

अतिशय छान माहिती

akshar11

very informative.

Akshar

This is really very informative book.

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel

Books related to भारताची महान'राज'रत्ने


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
 भवानी तलवारीचे रहस्य
सुधा मुर्ती यांची पुस्तके
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
संभाजी महाराज - चरित्र (Chava)
झोंबडी पूल
सापळा
गावांतल्या गजाली
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
जगातील अद्भूत रहस्ये
खुनाची वेळ
अजरामर कथा