तसं पहायला गेलं भारतीय भूमीत एकापेक्षा एक सरस वीर उत्पन्न होण्याचा इतिहास आहे. भारतीय भूमीसाठी लढणारा प्रत्येक वीर हा अमूल्य रत्न होता. काही वेळा असेही हे प्रसंग आले की ज्या वेळी या भारतभूमीवर स्वकीयांची सत्ता न राहता परकीय आक्रमकांचे सत्ता राहिली. अशावेळी भारतातील काही सत्तालोलुप  राजे अशा परकीय सत्तांचे गुलाम झाले , परंतु काहीजण परकियांची सत्ता आपल्या भूमीवर स्थापित व्हायला  नको म्हणून स्वातंत्र्यासाठी लढत राहिले. सुरुवातच करायची झाली तर चंद्रगुप्त मौर्य ... जे ग्रीकांची सत्ता उलथवून टाकण्याचे प्रयत्न करीत होते . महाराणा प्रताप... त्यांनी मोगलांच्या तावडीतून आपला प्रदेश स्वतंत्र ठेवण्यापासून ठेवण्यासाठी मुघलांविरुद्ध लढा दिला.  तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज ,मुघल , आदिलशाही आणि परकीय सत्ता विरुद्ध लढा दिला. पृथ्वीराज चौहान हे अशाच काही वीरांच्या मांदियाळीतील एक नाव... पृथ्वीराज चव्हाण यांनी  परकीयांशी तर लढा दिलाच  पण त्यांना स्वकियांशी लढा द्यावा लागला.

    पृथ्वीराज चौहान हे  चौहान वंशाचे हिंदू क्षत्रिय राजा होते, जे उत्तर भारतात १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात अजमेर आणि दिल्ली वर राज्य करत  होते.

भारतेश्वर, पृथ्वीराज तृतीय, हिन्दूसम्राट, इत्यादी नावांनी ते प्रसिद्ध आहेत. भारतातले ते तत्कालीन अंतिम हिन्दूराजा म्हणून प्रसिद्ध पृथ्वीराज १२३५ विक्रम संवत्सरात १५व्या वर्षी ते सिंहासनावर आरूढ़ झाले.

    पृथ्वीराज ने दिग्विजय अभियानात ११७७ वर्षी भादानक देशाच्या,  ११८२ वर्षी जेजाकभुक्ती शासकास व ११८३ वर्षी  चालुक्य वंशीय शासकास  पराजित केले. भारतात उत्तरभागात  घोरी नावाचा योद्धा आपल्या शासन आणि धर्माच्या विस्ताराच्या कामनेने अनेक जनपदांना कपटाने वा बलाने पराजित करत होता. त्याच्याशी पृथ्वीराजाचा संघर्ष अटळ होता.

   गुजरात राज्याच्या पाटण मध्ये पृथ्वीराजचा  जन्म झाला. पृथ्वीराज विजय महाकाव्यात हा उल्लेख मिळतो.

   पृथ्वीराजाचे  पिता सोमेश्वर, माता कर्पूरदेवी होते. 

पुत्र जन्माच्या पश्चात पिता सोमेश्वर यांनी पुत्राचे  भविष्य सांगण्यासाठी राजपुरोहितांना बोलावले. त्यानंतर त्यांनी बालकाचे भाग्यफल पाहून राजपुरोहितांनी "पृथ्वीराज" नामकरण केले पृथ्वीराज विजय महाकाव्यात नामकरणाचा उल्लेख आहे

 

  “ पृथ्वीं पवित्रतान्नेतुं राजशब्दं कृतार्थताम्।

   चतुर्वर्णधनं नाम पृथ्वीराज इति व्यधात्॥"

 

    गुजरात राज्य तेव्हा सोमेश्वर अजमेरू प्रदेशात स्थानान्तरित झाले. तेव्हा पृथ्वीराजाचे वय पांच वर्षाचे होते. पृथ्वीराजाचे अध्ययन अजयमेरु प्रासादात आणि विग्रहराजद्वारे स्थापित सरस्वती कण्ठाभरण विद्यापीठात झाला. प्रासाद और विद्यापीठ के प्रांगणात युद्धकला आणि शस्त्रविद्येचे ज्ञान पृथ्वीराज ने प्राप्त केले.

   पृथ्वीराजाने  मीमांसा, वेदान्त, गणित, पुराण, इतिहास, सैन्य विज्ञान और चिकित्साशास्त्र यांचेही भी ज्ञान प्राप्त केले होते. तो संगीत , कला और चित्र कला में भी प्रवीण होता. पृथ्वीराज रासो काव्यात उल्लेख आहे की धनुर्विद्येत पारंगत पृथ्वीराज शब्दभेदी बाण चालवण्यात सक्षम होता.

    सोमेश्वराच्या निधन पश्चात् पृथ्वीराजाचि राज्याभिषेक झाला.

   अश्वमेधयज्ञाच्या  नंतर स्वयंवरकाळात जेव्हा संयोगिता हातात वरमाला घेऊन उपस्थित राजे कोण आहेत ते बघत असताना तिने दरवाजावर स्थित पृथ्वीराजची मूर्ती पाहिली.  संयोगिता ने मूर्तिजवळ जाऊन वरमाला पृथ्वीराजच्या मूर्तीला घातली.  त्याच  क्षणु प्रासादात अश्वारूढ पृथ्वीराज प्रविष्ट झाले. त्याने सर्व  राजांना को युद्धासाठी  ललकारले. पश्चात् संयोगिताला घेऊन इन्द्रप्रस्थाला प्रस्थान केले.

    महाराज पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा सोळा वेळा पराभव केला व प्रत्येक वेळी त्याला जीवदान दिले.  परंतु कन्नौजचे महाराज जयचंद यांनी महाराज पृथ्वीराज चौहान यांचेवरील सूडापोटी गझनीचा मोहम्मद घोरी या परकीय आक्रमणकर्त्याशी हातमिळवणी करून सरतेशेवटी पृथ्वीराज चौहान यांचा पराभव करून दिल्ली आणि भारतामध्ये लूट करून सर्व दौलत गझनीला नेली व महाराज पृथ्वीराज चौहान यांना कैद केले.

     त्यानंतर घोरीने पृथ्वीराजने इस्लाम स्वीकारावा म्हणून त्यांचे हाल केले. त्यांचे डोळे काढून त्यांना दृष्टिहीन केले. नंतर पृथ्वीराज ने आपल्या शब्दभेदी कौशल्याच्या जोरावर घोरीचा त्याच्याच दरबारात वध केला व पृथ्वीराज आणि त्याचा सहाय्यक भाट यांनी एकमेकांवर पूर्वीच ठरल्याप्रमाते तलवारीने वार केले असे सांगितले जाते.

    

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel