११ एप्रिल १९५५, काश्मीर प्रिन्सेस हे एअर इंडियाचे constellation विमान हवेंतील ढगांना चिरत इंडोनेशियाच्या दिशेने जात होते. हाँग कोन्ग मधून ह्या विमानाने आधारानं ४ वाजता उड्डाण केले होते आणि आता ९ वाजता ते समुद्रावर उडत होते. त्याकाळी विमानात एक विमान अभियंता सुद्धा असायचा. अभियंते कर्णिक त्यावेळी विमानात होते. ते जिथे झोपले होते तेथून त्यांना तिसऱ्या इंजिन मधून धूर येताना दिसला, काही वेळाने एक छोटा स्फोट सुद्धा झाला. त्यांनी तात्काळ धाव घेऊन विमान कप्तान डी के जातार ह्यांना सूचित केले. विमानाचे दिशादर्शक होते पाठक, त्यांनी ग्लोरिया बेरी ह्या हवाई सुंदरीला घडलेला प्रकार सांगितला. प्रोसिजर प्रमाणे कप्तान ने सामान ठेवण्याच्या कक्षांत co २ गॅस सोडला. ग्लोरिया ने सर्व प्रवाश्याना life वेस्ट दिली. अभियंते कर्णिक ह्यांच्या मते आग कदाचित सामान ठेवलेल्या कक्षांत सुरु झाली होती.
कप्तानाने रॅपिड डिसेंट म्हणजे वेगाने विमानाची उंची कमी केली. आता विमान पाण्यावरून काही शेकडो फूट वरच उडत होते. त्याचे वेळी सह विमान चालक दीक्षित ह्यांनी रेडिओ वरून 'मे डे' 'मे डे' संदेश पाठवायला सुरुवात केली होती. मे डे ह्याचा संबंध मे महिना किंवा इंग्रजी दिवस (डे) शी नाही, मे डे म्हणजे फ्रेंच भाषेंत "माझी मदत करा".
विमान इंडोनेशियाच्या जवळ होते पण कुठल्याही विमानतळा पासून फार दूर होते. १८००० फूट वरून आता ते ३०० फूट वर पाण्याच्या जवळून उडत होते. दीक्षित जोराने रेडिओ वर ओरडत होते पण कुठूनही रिस्पॉन्स येत नव्हता. ग्लोरिया बेरी घामाघूम झाली होती आणि सीट बेल्ट घालून आपल्या सीटवर घट्ट बसली होती. सर्व प्रवासी life वेस्ट घालून चिंताग्रस्त चेहेर्याने बसले होते. खिडकीतून फक्त धूर आणि पाणी दिसत होते.
कप्तान विमानाला ताब्यांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते तर दीक्षित रेडिओवर एखादे नौदलाचे विमान, बोट वगैरे सापडते का पाहत होते. पाठक ह्यांनी नकाशे काढून जवळ पास कुठे बेटे वगैरे आहेत, किंवा विमान पाण्यात उतरलेच तर कॉ-ऑर्डिनेट्स कसे कळवावेत ह्या दृष्टीने काम सुरु केले होते.
पण ह्या विमानातील प्रवासी कोण होते ? विमानाने प्रवास सुरु केला होता मुंबईतून आणि हाँग कोन्ग मध्ये त्याने halt घेतला होता. विमानातील सर्व प्रवासी पूर युरोपिअन देशातील लोक होते तसेच चिनी सरकारी अधिकारी होते जे इंडोनेशिआयातील बांडुंग येथे आफ्रो आशियाई कॉन्फरन्स मध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. त्याशिवाय अनेक पत्रकार मंडळी ह्यांत होती.
विमान आता पाण्यापासून फार फार जवळ होते. जातार ह्यांनी इंजिन बंद केले होते, केबिन मध्ये धूर पसरत होता. विमान अतिशय हादर होते त्यावरून विमानाला खाली भगदाड पडले असावे असे जाणवत होते. "We are ditching" कप्तानाने जाहीर केले. ह्याचा अर्थ विमान पाण्यावर उतरवून विमान नष्ट झाले तरी चालेल पण शक्य तितके जीव वाचवायचे असा होतो.
काही क्षणांनी विमान पाण्यावर आदळले आणि केबिन मध्ये हल्लकल्लोळ माचला. विमान पाण्यावर काही तास तरी फ्लोट होऊ शकते पण ह्या विमानाला भगदाड पडले होते. ग्लोरियाने प्रसंग सावधान दाखवत मुख्य द्वार उघडले. प्रवाशी द्वारांतून उड्या मारत होते. ग्लोरिआ ने कॉकपीट मध्ये येऊन सर्वाना पाण्यात उड्या ,मारण्याची विनंती केली. कप्तानाने सर्वप्रथम पाठक ह्यांना उडी मारायला सांगितले. ते दिशादर्शक होते आणि जवळपास कुठे बेटें आहेत हे त्यांनी हेरले होते.
आता केबिन मध्ये पाणी भरायला लागले होते. विमानाची शेपटी आता पूर्ण पणे पाण्याखाली होती आणि विमान उभ्या उभ्या जलसमाधी घेईल असे वाटत होते. अनेक प्रवासी बेशुद्ध पडले होते तर प्लेन च्या मागे बसलेले प्रवासी पाण्याखाली धडपडत होते. प्रवाश्याना मदत करण्याची सोय नव्हती. पाठक, कर्णिक आणि दीक्षित ह्यांनी पाण्यात उडी घेतली आणि ग्लोरिआ कप्तान जातर ह्यांना बरोबर येण्याची विनवणी कारण होती. "Sir, please jump with me" अश्रुपूर्ण नेत्रांनी तिच्या विनवण्या सुरु होत्या. अनेक प्रवासी आता पाण्यात अडकले होती. मुख्य द्वार सुद्धा जवळ जवळ पाण्याखाली होते. दीक्षित आणि कर्णिक लाटांनी दूर गेले होते पण पाठक अजून विमानाच्या दाराजवळ पोहत किमान ग्लोरिया बाहेर येईल ह्याची वाट पाहत होते.
पण विमानाने जलसमाधी घेतलीच. ग्लोरिया बाहेर आली नाही, पुढे जेंव्हा विमानाचा सांगाडा सापडला तेंव्हा कप्तान जातार ह्यांचा मृत देह कॉकपीटमध्येच आपल्या सीट वर आसनस्थ होता आणि त्यांचे दोन्ही हाथ सुकाणूवर होते. ग्लोरिया सुद्धा कॉकपीट मध्येच होती.
भारतीय विमान सेवेंत नीरजा भानोत ह्या एका हवाईसुंदरीने कर्तव्यनिष्ठतेचे नवीन मापदंड ठरवले होते पण त्याच्या आधी सुद्धा ग्लोरिया बेरी आणि कप्तान जातार ह्यांनी सुद्धा विलक्षण कर्तव्य निष्ठता दाखवली होती. भारत सरकारने सुद्धा द्यायची ती चक्रे वगैरे देऊन त्यांचा सन्मान केला पण ग्लोरिया बेरीला कुठलाही सन्मान दिला नाही. पण महत्वाचे म्हणजे संपूर्ण जगांतील वैमानिकांनी आणि विमानसेवेच्या कर्मचाऱ्यांनी ह्याची दखल घेतली आणि त्यांची स्तुती केली. चिनी वार्ता संस्था xinua चे ३ पत्रकार ह्यांत मृत्युमुखी पडले त्यांनी सुद्धा २००५ मध्ये भारतीय वैमानिकांच्या धैर्याची स्तुती केली आणि ह्या दुर्घटनेच्या आठवणी साठी एक सिम्पोसिअम ठेवला.
विमान गायब झाले हि गोष्ट इंडोनेशियन विमानतळावर लक्षांत आली. भारतीय नौदल, इंडोनेशियन नौदल आणि चिनी नौदल ह्यांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली. पाठक पाण्यांत पोहत होते. त्यांना जवळपास बेट कुठे आहे हे ठाऊक होते त्यामुळे त्या दिशेने त्यांनी पोहायला सुरुवात केली. मृतदेह सगळीकडे पसरले होते पण कर्णिक आणि दीक्षित ह्यांचा पत्ता नव्हता. त्यांनी ओरडून ओरडून कोणी जिवंत आहे का हे पाहायचा प्रयत्न केला .पण कुणीच उत्तर दिले नाही.
श्रमाने आणि धक्क्याने शेवटी पाठक ह्यांची शुद्ध हरपली. life वेस्ट होता त्यामुळे ते बुडाले नाहीत. त्यांना जाग आली तेंव्हा ते एका छोट्या बेटावर होते. तिथे कोणीच माणूस नव्हता पण त्यांना दुरुन मासेमारीची बोट दिसत होती. ते थकले होत पण प्रसंग सावधान दाखवून त्यांनी हातवारे केले. काही वेळाने इंडोनेशियन नौदलाने त्यांच्यासाठी बोट पाठवली.
नंतर कळले कि दीक्षित आणि कर्णिक सुद्धा पोहून एका बेटावर अडकले होते. ह्या संपूर्ण दुर्घटनेत फक्त ३ लोक वाचले होते.
घातपात
कर्णिक ह्यांच्या मते आग सामान कक्षांत लागली होती. हाँग कोन्ग ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली होते त्यामुळे त्यांनी तात्काळ शोध सुरु केला आणि काही विलक्षण गोष्टी सामोरे आल्या. ह्या प्लॅनवरून चिनी प्रेसिडेंट झोऊ एनलाई बांडुंग ला जाणार होते. खूप कमी लोकांना ह्याची माहिती होती. पण विमानात बसायच्या काही तास आधी त्यांच्या पोटांत दुखू लागले आणि त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली ह्यामुळे ते त्या विमानात बसूच शकले नाहीत.
पोलिसांना विमानाच्या सांगाड्यांत time bomb चे अवशेष सापडले. शेवटी हा बॉम्ब केला सफाई कर्मचाऱ्याने आंत ठेवला होता हे सुद्धा हाँग कोन्ग पोलिसांनी शोधून काढले. हा माणूस अमेरिकेच्या मदतीने तैवान मध्ये पळून गेला होता. अमेरिका आणि तैवान ने त्याला संरक्षण दिले. ह्यामुळे त्याचे कर्ते कदाचित CIA असेल असा सर्वांचा समज झाला.
आता ह्या दुर्घटने बाबतचे अनेक गुप्त दस्तऐवज उपलब्ध आहेत अन त्यावरून असे समजते कि चिनी राष्ट्रीय पार्टीने हा स्फोट घडवून आणला होता. त्यासाठी हाँग काँगच्या सफाई कर्मचाऱ्याला पैसे देऊ केले होते. CIA ला सुद्धा झोऊ ची हत्या घडवायची होती पण त्यावेळच्या अमेरिकन राष्ट्रपतींनी अश्या कामाला मंजुरी देण्यास साफ नकार दिला होता.
नंतर खूप वर्षांनी झोऊ ह्यांनी हेन्री किससिंगर ह्यांना चीन मध्ये बोलावले आणि सरळ सरळ प्रश्न केला कि त्या स्फोटांत अमेरिकेचा हात होता का ? त्यावेळी किससिंगर ह्यांनी हसून उत्तर दिले कि "As I told the Prime Minister the last time, he vastly overestimates the competence of the CIA".
जातर ह्यांच्या कुटुंबाचा ब्लॉग : https://jatars.wordpress.com/
इतर sources https://bookstruck.app/